हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । स्मृती इराणी सध्या केंद्रीय मंत्री आहेत, पण निर्माती एकता कपूरशी तिची मैत्री बर्यापैकी जुनी आणि मजबूत आहे. एकता कपूरने टीव्ही जगातील सर्वात सुपरहिट सीरियल ‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्रीला नेत्रदीपक अशी “तुलसी” दिली आणि या दोघांची मैत्री ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जमली.
अलीकडेच एकता कपूरने तिची सर्वात खास मैत्रिण स्मृती इराणी हिच्यासाठी इंस्टा अकाउंटवर एक अतिशय भावनिक पोस्ट लिहून तिला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मैत्रीचे एक उदाहरणही ठेवले.
त्यांनी लिहिलं आहे की, “जेव्हा या बाईने माझ्याबरोबर काम करण्यास सुरूवात केली तेव्हापासून आमच्यात चांगली गट्टी जमली. आता ती राजकारणाकडे वळली आहे.चित्रपट असो कि राजकारण, व्यवसाय असो किंवा पालन-पोषण असो सर्व प्रकारच्या कामात स्मृती माहिर आहे. ती नेहमीच स्वतःला चांगले बनवण्याची अपेक्षा करत असतात. फक्त महिला दिनालाच नाही तर प्रत्येक दिवस आम्ही आमची मैत्री साजरी करतो, मी स्त्रियांबद्दल इतकेच म्हणू शकते की मजेदार व्हा, मजेत रहा, आपण ज आहात तेच व्हा.”.
एकता कपूरच्या या सीरियलमुळे स्मृती इराणी घराघरात प्रसिद्ध झाल्या. कदाचित हीच ती ओळख होती ज्याद्वारे स्मृतीनेही स्पष्ट बोलणारी स्त्री म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. स्मृती सध्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात वस्त्रोद्योग मंत्री आहेत. पण स्मृती तिची एकता कपूरशी मैत्रीही चांगली ठेवते. त्या दोघी अनेकदा भेटतात आणि स्मृती एकताचा मुलगा रवी कपूर यालाही जीव लावतात.