Take a fresh look at your lifestyle.

उचलली जीभ लावली टाळ्याला ; कंगणावर संतापल्या रेणुका शहाणे

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणापासून अभिनेत्री कंगना रणौत तिच्या काही रोखठोक भूमिकेमुळे सतत चर्चेत येत आहे.नुकतंच कंगणाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटवरुन केली होती. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी कंगनावर निशाणा साधला आहे. ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला’, अशा शब्दात अभिनेत्री रेणुका शहाणेंनी कंगनावर संताप व्यक्त केला आहे.

रेणुका शहाणे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,  मुंबई असं शहर आहे, जिथं आपलं बॉलिवूड स्टार व्हायचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळं कुणीही आपल्याकडून या शहराप्रती आदर व्यक्त व्हावा, अशीच अपेक्षा व्यक्त करेन. तू पीओकेसोबत मुंबईची तुलना केलीस, हे भीतीदायक आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला.

रेणुका शहाणे यांच्या ट्विटला कंगणानेही उत्तर दिलं आहे. कंगणा म्हणते, प्रिय रेणुकाजी जेव्हा सरकारच्या खराब कारभारावर टीका केली जाते, तेव्हा ती प्रशासन आणि सरकारवर एकसमान पद्धतीनं केली जाते, मला विश्वास नाही की आपण इतक्या भोळ्या आहात. आपणसुद्धा तहानलेल्या गिधाडाप्रमाणे माझ्या रक्ताचा, माझ्या मांसाचा तुकडा घेण्याची वाट पाहत होता? आपल्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत, असं कंगनानं म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’