Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मिर फाईल्स’मूळे निर्मात्यांमध्ये नव्या शीर्षकासाठी चढाओढ; ट्विंकल खन्नाची खोचक प्रतिक्रिया

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामे केली. अजूनही हा चित्रपट त्याच ओघात कमावतोय. दरम्यान ‘बच्चन पांडे’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘अटॅक’ या चित्रपटांसोबत ‘द काश्मिर फाईल्स’ची तगडी स्पर्धा लागली असतानाही २०० कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे. दरम्यान या चित्रपटामुळे बऱ्याच चित्रपटांना कमवायची संधी मिळाली नाही. या चित्रपटाबाबत आधीच २ मतप्रवाह असताना आता अभिनेत्री ट्विंकल खन्नाने चतुरपटावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

‘TOI’च्या स्तंभात ट्विंकलने लिहिलंय की, ‘एका निर्मात्याच्या ऑफिसमध्ये मिटींगदरम्यान मला अशी माहिती मिळाली की ‘द काश्मीर फाईल्स’नंतर आता नव्या शीर्षकांसाठी चढाओढ सुरू झाली आहे. मोठ्या शहरांवर आधीच दावा केल्यामुळे आता बिचारे लोक अंधेरी फाईल्स, खारदंडा फाईल्स, साऊथ बॉम्बे फाईल्स यांसारख्या नावांचं रेजिस्ट्रेशन करत आहेत. मी फक्त याचा विचार करतेय की मी माझे सहकारी आतासुद्धा स्वत:ला दिग्दर्शक म्हणू शकतात का? की या सर्व फाइलिंगसोबत तेसुद्धा खरे राष्ट्रवादी मनोज कुमार यांच्यासारखे क्लर्क झाले आहेत,’ असा टोमणा ट्विंकलने या लेखातून लगावलाय.

इतकेच नव्हे तर ट्विंकलने आणखी लिहिलंय की, ती आता ‘नेल फाईल्स’ या नावाने चित्रपट करण्याचा विचार करतेय. यावर आई डिंपल कपाडिया म्हणाल्या कि तुझा हा चित्रपट अत्यंत विचित्र मॅनीक्युअरवर तर आधारित नाही ना’. यावर मी तिला म्हटलं, “कदाचित असू शकतं. किमान सांप्रदायिक शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकण्यापेक्षा हे तरी चांगलं आहे”, असं ट्विंकलने पुढे लिहिलं. ‘द काश्मीर फाईल्स’मुळे बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ फार कमाऊ शकला नाही म्हणून का काय हा सगळं खटाटोप हे ज्याचं त्याला माहित. पण सोशल मीडियावर अशीच काहीशी चर्चा सुरु आहे.