Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये 2 अज्ञात तरुणांची घुसघोरी; भिंत तोडून शिरले घरात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 3, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
SRK Mannat
0
SHARES
221
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी त्याच्या बंगल्याबाहेर म्हणजेच ‘मन्नत’बाहेर येताना दिसतो. त्याच घर मुंबईतील जणू एक पर्यटन स्थळचं झाले आहे. शाहरुख खानचा बंगला ‘मन्नत’ हा मुंबईतील बांद्रा येथे आहे. शाहरुखचे हजारो चाहते त्याची एक झलक पहायला मिळेल या आशेने रोज ‘मन्नत’ बाहेर गर्दी करत असतात. त्यामुळे अनेकदा शाहरुख ‘मन्नत’च्या बाहेरील गॅलरीत येऊन त्याच्या चाहत्यांची भेट घेताना दिसतो. पण सध्या ‘मन्नत’ची सुरक्षा धोक्यात आहे असा प्रकार घडला आहे. काल मध्यरात्री २ तरुणांनी ‘मन्नत’ बंगल्याची भिंत तोडून घरात घूसखारी केल्याचा प्रकार घडला आहे.

Two men break into Shah Rukh Khan's bungalow Mannat, police probe on

Read @ANI Story | https://t.co/76VgzQ4FMO#SRK #Mannat #ShahRukhKhan #MumbaiPolice #Pathaan pic.twitter.com/pH1CbitJfo

— ANI Digital (@ani_digital) March 2, 2023

अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात गुरुवारी मध्यरात्री २ अज्ञात तरुणांनी जबरदस्तीने प्रवेश केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य म्हणजे ‘मन्नत’ बंगल्यात इतकी कडक सिक्युरिटी असूनही हे २ अज्ञात तरुण शाहरुखच्या बंगल्यात थेट घुसलेच कसे असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. एकंदरच या प्रकारावरून सिक्युरिटी गार्डचं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे हे दिसून येत आहे. या अज्ञात तरुणांनी शाहरुखच्या बंगल्यात प्रवेश करीत थेट तिसरा मजला गाठला आणि लपून बसले होते. यावेळी घरात शाहरुख खान नव्हता. या दोन अज्ञात तरुणांना मुंबई पोलिसांनी तडक कारवाई करत अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती देत पोलिसांनी सांगितले कि, ‘मन्नतच्या बाहेरील भिंत तोडून बंगल्याच्या आवारात प्रवेश केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले.

शिवाय चौकशीदरम्यान, ‘या तरुणांनी केलेल्या दाव्यानुसार ते गुजरातमधून आले आहेत आणि त्यांना शाहरुखला भेटायचे होते म्हणून त्यांनी शाहरुखच्या बंगल्यात प्रवेश केला. पुढे तिथे कचरा पसरवण्यास सुरुवात केली आणि तिसऱ्या मजल्यावर लपून बसले. पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. हा सर्व प्रकार घडला तेव्हा सुदैवाने शाहरुख खान घरात उपस्थित नव्हता. कारण तो जवान सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर गेला होता. जेव्हा तो परतला तोपर्यंत हे प्रकरण मिटलं होतं.

Tags: ANIBollywood CelebrityMannatShahrukh KhanTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group