Take a fresh look at your lifestyle.

BiggBoss15- ‘हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे’; उमर रियाझच्या हकालपट्टीवर भाऊ असीम रियाझचा उद्रेक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १५ सध्या चांगलाच रंगात आला आहे. मुख्य म्हणजे अंतिम टप्प्यावर पोहोचलेला बिग बॉस आणखी २ आठवडयांनी लांबल्यामुळे स्पर्धकांनाही जिंकण्यासाठी आणि दुसऱ्याला शर्यतीतून मागे ओढण्यासाठी आणखी काही वेळ मिळाला आहे. दरम्यान नुकताच बिग बॉसच्या घरातून उमर रियाझ बाहेर पडला आहे. खरतर तर तो बाहेर पडला नाही तर त्याला बाहेर काढलं आहे. सोशल मीडियावर अनेक लोक उमरला घरातून बेघर करण्याला चुकीचे म्हणत असताना आता त्याचा भाऊ मीडियासमोर आल्यानंतर प्रश्न उत्तर होणार नाही असे कसे होईल? असीम रियाझने मीडियाशी बोलताना सांगितले की, जे काही झाले ते चुकीचे आहे पण ते झालेच. हि गोष्ट कितीही अन्यायकारक असली तरी प्रेक्षकांना सगळं काही समजत. उमर पुन्हा बिग बॉसमध्ये परतणार का? या प्रश्नावर मात्र असीमने मला हे माहीत नाही असे स्पष्ट उत्तर दिले आहे.

असीम रियाझ हा स्वतः बिग बॉसच्या तेराव्या सीजनमधील उपविजेता स्पर्धक आहे. त्यामुळे बिग बॉसचा खेळ त्याच्यासाठी नवीन नाही. याच पार्श्वभूमीवर आपल्या भावाची पाठराखण करताना असीम म्हणाला की, “ज्यांनी उमरला पाठिंबा दिला त्यांचे मनापासून आभार. सगळ्यांनी सगळे बघितले म्हणूनच सपोर्ट करत आहेत. घरात इतके स्पर्धक होते. दरम्यान प्रत्येकाने धक्का दिला आहे. उमरने दिलेला धक्का तर दाखवलाही नाही. जे काही झाले ते जाणूनबुजून झाले. ” त्यानंतर समोरून प्रतिक्रिया आल्या. “त्याचा खेळ खूप मजबूत होत होता. सीझनमध्ये उमरविरुद्ध सर्वांना मार्गदर्शन केले जात असल्याचे मी त्या दिवशी पाहत होतो. उमरमुळे हे घडत आहे. उमरमुळेच होत आहे. हे अन्यायकारक आहे पण झाले आहे.”

त्याचे झाले असे कि, उमर रियाझ आणि प्रतीक सहजपाल यांच्यात खूप जोरदार भांडण झाले होते. या दरम्यान उमरने प्रतीकला धक्काबुक्की केली. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला बाहेर काढा अशी जोरदार मागणी होऊ लागली. मात्र, उमर रियाझचे चाहते आणि त्याचा भाऊ असीम तसेच बिग बॉस १३ मधील एक्स स्पर्धक हिमांशी खुराना उमरच्या समर्थनार्थ उतरले. अनेक स्टार्सनेदेखील उमरला पाठिंबा दिला. यामागचे कारण असे की, असे कृत्य करून अनेक लोक बिग बॉसमध्ये राहिले आहेत. मग उमरला बाहेर का काढावे..? मात्र अखेर उमरला घरचा रस्ता दाखविण्यात आलाच.