Take a fresh look at your lifestyle.

एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे उमेशच्या नाटकाचा प्रयोग रद्द; प्रेक्षकांचा हिरमोड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लाडका अभिनेता उमेश कामत हा चित्रपटांपेक्षा जास्त मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतो. अत्यंत गुणी आणि अव्वल अभिनेता म्हणून त्याची ख्याती आहे. उमेश सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. यामुळे सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

सध्या फुलपाखरू फेम हृता दुर्गुळेसह उमेश दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. पण सध्या उमेशची सोशल मीडियावरील एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यामध्ये त्याने एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे आपल्या नाटकाचा प्रयोग रद्द झाल्याचे सांगितले आहे. ज्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

अभिनेता उमेश कामत याने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे कि, एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे रविवार ५ जूनचा चिंचवड येथील दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचा प्रयोग रद्द. पुढे कंसात लिहिले आहे कि, प्रेक्षकांचे तिकिटांचे पैसे परत करण्यात येतील. हि पोस्ट पाहिल्यानंतर नक्कीच उमेशचे चाहते आणि नाटकप्रेमी प्रेक्षकांचा हिरमोड झाला असणार यात काही वादच नाही. पण एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे नाटकाचा प्रयोग रद्द होऊन मनोरंजनात खंड पडणे हि अतिशय खेदजन्य बाब आहे.

हीच पोस्ट अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर करीत आल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले आहे. गेल्या २ वर्षांपासून या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलाय. या नाटकामध्ये उमेश आणि हृता मुख्य भूमिकेत असून भाऊ आणि बहिणीचे पात्र साकारत आहेत. रंगभूमीवरील त्यांची केमिस्ट्री अतिशय कमालीची आहे. लोकांनाही हे भाऊ बहीण भारीच भावले आहेत.