Take a fresh look at your lifestyle.

‘तेरी आख्या का यो काजल’! सपना चौधरीच्या गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मोहक अदा आणि बहारदार नृत्याने नेटिझन्सना वेड लावणारी नृत्यांगना सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सपना चौधरीचे ‘तेरी आख्या का यो काजल’ हे गाणे तर सोशल मीडियावर फारच व्हायरल झाले होते. वेस्ट इंडियन बॅट्समन क्रिस गेललाही या गाण्याची चांगलीच भुरळ पडली होती. यानंतर आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा हे गाणे चर्चेत आले आहे. एका काकांनी या गाण्यावर असा काही डान्स केलाय कि पाहणारा चक्रावून जाईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे.

सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात आता या काकांच्या व्हिडिओची भर पडली आहे. कारण आता जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात थिरकणारे हे काका एकदम टिपीकल देसी स्टेप्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या आरारा खतरनाक अशा स्टेप्स सगळ्यांचा लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ कुण्या एका कार्यक्रमातला असून ”तेरी आख्या का यो काजल’ या गाण्यावर परफॉर्मन्स सुरु होतो. दरम्यान एक एक व्यक्ती स्टेजवर येऊन नाचू लागतो. त्याच्या डान्स स्टेप्स इतक्या खतरनाक होत्या कि इतर कलाकार स्वतःचा डान्स विसरून जातात का काय असे वाटू लागले. चित्र- विचित्र डान्स स्टेप्स करून या व्यक्तीने सपना चौधरीच्या गाण्यावर अक्षरशः कल्ला केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही हसून हसून लोट पोट व्हाल यात काही वादच नाही. उपस्थितांपैकी कुणीतरी हा व्हिडीओ करून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यानंतर आता हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. इतकेच काय तर इंडियन कॉमेडीयन सुनील ग्रोवर यानेदेखील हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सुनील ग्रोवरने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘हा व्हिडीओ पाहून मन भरत नाहीये. सारखं सारखं हा डान्स पाहण्याचं मन करतंय’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर नुसता हशा पिकवतोय. एव्हढं नक्की आहे कि, सपनाच्या लटके झटके या काकांच्या चित्र विचित्र डान्ससमोर फिके पडत आहेत.