हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी ३’ हा शो सध्या लोकप्रियतेच्या उच्चांकावर आहे. नुकतेच घरातले एलिमिनेशन सुरु झाले असून आतापर्यंत अक्षय वाघमारे आणि सुरेखा कुडची यांची एक्झिट झाल्याचे पाहायला मिळाले. थोडं प्रेम, थोडे दंगे, भन्नाट टास्क ज्याची स्पर्धक लावतात वाट. होय. चांगल्या चांगल्या टास्कची हे स्पर्धक वाट लावतात, टास्क वाया घालवतात असे फक्त प्रेक्षकांचे नव्हे तर ‘बिग बॉसचा एक्स स्पर्धक पराग कान्हेरेदेखील तेच म्हणतोय. म्हणतोय काय? तो इतका वैतागला आहे कि त्याने थेट एक पोस्ट लिहून आपली निराशा व्यक्त केली. गेल्या २-३ आठवड्यात इतक्या टास्कचा विचका झाला आहे कि कॅप्टनसुद्धा झाला नाही. पण यावेळी मात्र सुरेखाने जाता जाता तृप्ती देसाईंना कॅप्टन्सी दिलीच. पण वाया गेलेल्या टास्कवर नाराजी व्यक्त करीत परागने आपला संताप व्यक्त केला आहे. तर सुरेखा कुडची यांच्या एव्हिक्शनवर देखील त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
सुरेखा कुडची यांच्या एव्हिक्शनवर परागने लिहिले कि, दुर्दैवी eviction ‘सुरेखा कुडची’ तिने नुकताच खरा खेळ खेळायला सुरुवात केली होती. सीझन 2 मध्ये अभिजीत केळकर देखील एक unexpected eviction होते (जरी तो माझा प्रतिस्पर्धी होता आणि आमच्या दोघांमध्ये कटुता होती. पण तो हुशारी असलेला खेळाडू होता). कधीकधी मतांवर आणि निर्णयांवर आपले नियंत्रण नसते. अशा प्रकारच्या रिअॅलिटी शोमध्ये evict करण्याचे अनेक पैलू आहेत, which can go either ways. Anyway.. my best wishes to SurekhaJi
तर स्पर्धकांवर नाराजी व्यक्त करताना त्याने लिहिले होते कि, ‘बिग बॉसची प्रॉडक्शन टीम हा शो अधिक लोकप्रिय करण्यासाठी बराच प्रयत्न करत आहे. मला माहित आहे की ते ब्रेकशिवाय सुमारे १६ तास काम करतात. पण हे स्पर्धक निकाल न देता टास्क वाया का घालवत आहेत? त्यामुळे त्यांची सर्व मेहनत वाया जात आहे. सोनाली हुशारीने खेळत आहे. विशाल विनाकारण तिच्याशी उद्धट वागू लागला आहे, तो स्वत:च्याच हितचिंतकांचे ऐकत नाही. सहानुभूती कार्ड प्रत्येकवेळी खेळलं जातं. ग्लॅमर ग्रुप आक्रमकपणे खेळत आहे, पण विशाल, विकास, मीनल आणि सोनालीने नीतीमत्तेसह खेळ खेळावा. कारण ते महाराष्ट्राचे आवडते स्पर्धक आहेत. विशालला कालच टास्क सहज जिंकता आला असता, कारण तृप्ती ताई त्यांच्या बाजूने होत्या. तो योग्य नियोजन करून टास्क खेळू शकला असता.
पुढे, सोबतच मीनल आणि सोनालीला विशालच्या बॅचेसचे संरक्षण करण्याची संधी मिळायला हवी होती. त्यामुळे निश्चितच टास्कचा निकाल चांगला मिळाला असता आणि विशाल कॅप्टन झाला असता. ‘मला माहिती आहे माझ्या या विधानांसाठी मला ट्रोल केले जाईल. पण विशाल हा माझा आवडता स्पर्धक असूनही, मला त्याच्या चुकांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. कारण तुमच्या सर्वांप्रमाणेच मी देखील प्रेक्षक म्हणून बिग बॉस मराठी पाहत आहे. ते पाहण्यासाठी मी माझा मौल्यवान वेळ घालवतो. या सर्वांमध्ये मी सेलिब्रिटी नाही. प्रत्येकाला माझ्या मतांचा आणि पोस्टचा विरोध करण्याचा अधिकार आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि नेहमीच करीन.