Take a fresh look at your lifestyle.

दुर्दैवाने माझ्या कुटुंबाने मला आधीच दोषी ठरवले आहे; पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राकडून खदखद व्यक्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना कायद्याची चौकट चांगलीच समजली. पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्रासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या अब्रूचे माध्यमांमध्ये धिंदवडे निघाले. यामुळे शिल्पा शेट्टीनेही अत्यंत मनस्ताप सहन केला. जेव्हा राज तुरुंगात होता तेव्हा शिल्पाने ट्रोलिंगचा भयंकर सामना केला. यामुळे तिला कामही थांबवावं लागलं होतं. दरम्यान राजला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा कामावर पुन्हा रुजू झाली आहे. मात्र गेले अनेक दिवस राज कुंद्रा शांत आहे. यानंतर त्याने अधिकृत स्टेटमेंट जारी करत, पोर्नोग्राफी प्रकरणी मौन सोडलं आहे.

राज कुंद्रा याने निवेदनात म्हटले कि, ‘माझ्याबद्दलची भ्रामक आणि बेजबाबदार वक्तव्ये आणि अनेक बातम्यांवर मी गप्प आहे आणि यामुळे मला दुबळं मानलं जातंय, असं दीर्घ चिंतनानंतर मला जाणवलं. मी सांगू इच्छितो की, मी माझ्या आयुष्यात कधीही ‘पोर्नोग्राफी’ प्रॉडक्शन वा डिस्ट्रिब्युशनमध्ये सामील झालेलो नाही. हे संपूर्ण प्रकरण दुसरं तिसरं काहीही नसून मला बदनाम करण्याचा कट आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे मी यावर फार बोलू शकत नाही. पण मी खटल्याला सामोरे जायला तयार आहे आणि माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तिथे अंतिमत: सत्याचाच विजय होतो. दुर्देवाने मीडिया व माझ्या कुटुंबाने मला आधीच दोषी ठरवलं आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून मला विविध प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुढे, विविध स्तरावर माझ्या मानवी आणि घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन केलं जात आहे. ट्रोलिंग आणि नकारात्मकता पसरवून माझ्याबद्दल समाजात द्वेष पसरवला जात आहे. पण येथून पुढे माध्यमांकडून सुरू असलेलं मीडिया ट्रायल बंद करावं आणि माझ्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होऊ नये, अशी आशा आहे. माझं कुटुंब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्यातरी इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत. मला विश्वास आहे की, घटनेनं प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे माझा हा अधिकार अबाधित राहावा, अशी इच्छा आहे.