Take a fresh look at your lifestyle.

बेगानी शादी में बिन बुलाए मेहमान?; आमंत्रणाशिवाय राहुल वैद्य आणि मिका सिंग पोचले लग्नात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल लग्न असो किंवा रिसेप्शन पार्टी अशा समारंभांमध्ये कलाकारांना बोलवणे हि फार सामान्य बाब झाली आहे. मुख्य म्हणजे कलाकार देखील मोठ्या उत्साहात अशा समारंभांना उपस्थिती दर्शवितात. मुख्य म्हणजे, कोणतेही कलाकार कुणाच्याही खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहतात म्हणजे ते आलं मनात गेले लग्नात असा कारभार आहे असे अजिबात समजू नका. कारण कलाकार काही मिनिटांच्या उपस्थितीसाठी बक्कळ फी चार्ज करतात आणि तुम्ही देत असाल तर मोठ्यातला मोठा कलाकार सुद्धा तुमच्या लग्नात हजेरी लावेल. पण जर.. कधी असं झालंच कि एखादा सेलिब्रिटी थेट तुमच्या लग्नात हजार झाला.. तर?

असे म्हणण्याचे कारण म्हणजे बॉलिवूड गायक मिका सिंग आणि राहुल वैद्य जेव्हा अचानक लग्न समारंभात उपस्थित राहतात तेव्हा तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? हे जाणून घ्यायचे होते. कारण हे असे खरोखरच सत्यात घडले आहे. होय. नुकतेच गायक राहुल वैद्य आणि मिका सिंग यांनी एका लग्नात न बोलवताच हजेरी लावली होती. इतकेच नव्हे तर या दोघांनी स्टेजवर जाऊन गाणे गायला सुरुवात केली आणि मग काय असा काही माहोल तयार झाला कि बस्स रे बस्स. मिका सिंग आणि राहुल वैद्यची अशी अचानक एंट्री पाहून सारेच भांम्ब्राऊन गेले.

बॉलिवूड जगतातील लोकप्रिय गायक मिका सिंगने या लग्नात गायक राहुल वैद्यासोबत नुसती एंट्री केली नाही. तर स्टेजवर जाऊन माईक हातात घेऊन ”सावन में लग गई आग’ हे गाणे गायला सुरुवात केली आणि खरोखरच स्टेजवर मनोरंजनाची आग लावली. इतकेच नव्हे तर यानंतर ज्यांच्या लग्नात गेले होते त्या नवरदेव आणि नवरीला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या. मात्र झाले असे कि, या दोघांची एंट्री त्यांच्यासाठी एकदम थ्रिल होती तर उपस्थित पाहुण्यांना हैराण परेशान करणारी ठरली. हे म्हणजे असं झालं कि बेगानी शादी में बिन बुलाए मेहमान।