Take a fresh look at your lifestyle.

‘समरेणू’च्या पोस्टरचे पंकजा मुंडेंच्या हस्ते अनावरण; रिलीजसाठी फक्त 38 दिवस बाकी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशी हटके टॅगलाईन असलेला आगामी मराठमोळा चित्रपट ‘समरेणू; येत्या मे महिन्याच्या १३ तारखेला रिलीज होणार आहे. यासाठी फक्त ३८ दिवस बाकी राहिले आहेत. याआधी ‘समरेणू’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरचे अनावरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी चित्रपटाचे कथानक, कलाकार आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे भरभरून कौतुक केले आहे.

पोस्टर प्रदर्शनाबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, “या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मी उत्सुक आहे. याचे कारण हे निर्माते माझ्या जिल्ह्यातील आहेत आणि या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बीड जिल्ह्यात झाले आहे. बीड जिल्ह्यात खूप कष्टकरी लोक आहेत, जे विविध राज्यात कामानिमित्ताने जातात. त्यांच्यात हुशारी असल्याने त्यांनी आपला ठसा विविध ठिकाणी उमटवला आहे. हा चित्रपट सफल व्हावा, याकरता मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchita Mangade (@mruchitaa)

तर चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता महेश डोंगरे म्हणतात, “हा माझा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून पहिला चित्रपट आहे. त्यामुळे मला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूपच उत्सुकता आहे. ही एक प्रेमकहाणी आहे. जास्त काही सांगणार नाही परंतु सम्या आणि रेणूच्या प्रेमाचा प्रवास एका रंजक वळणावर जाणार आहे. या चित्रपटाची संगीत टीम अतिशय जबरदस्त आहे. त्यामुळे चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील..”

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सम्या आणि रेणूची ‘समरेणू’ ही प्रेमकहाणी आहे. येत्या १३ मे २०२२ रोजी चित्रपटगृहात ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशी हटके टॅगलाईन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सम्या आणि रेणू दिसत आहेत. या चित्रपटात सम्या आणि रेणूच्या नात्याचं काय होत या प्रश्नच उत्तर शेवटपर्यंत उत्सुकता कायम ठेवतो. एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन महेश डोंगरे यांनी केले आहे. तर सूरज- धीरज यांचे संगीत असलेली आणि गुरू ठाकूर व क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभलेली गाणी यात आहेत. तर कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज या गाण्यांना लाभला आहे.