बस… चुकून कुणी पंखा लावू नका; उर्फीच्या नव्या फोटोशूटवर ट्रोलिंगची बरसात
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर आपल्या चित्र विचित्र लक्षवेधी कपड्यांमुळे सतत चर्चेत असलेली उर्फी जावेद आज पुन्हा चर्चेत आहे. वेगवेगळ्या वस्तू, फुलं, साखळ्या आणि अजून अनपेक्षित पदार्थांच्या सहाय्याने उर्फी विचित्र फॅशन करताना दिसते. बिग बॉस हिंदी ओटीटीच्या माध्यमातून प्रकाश झोतात आल्यानंतर उर्फी सतत तिच्या विविध पेहरावांमुळे चर्चेत राहिली आहे. अलीकडेच रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटने कहर केला होता. त्या रणवीरला उर्फी एव्हढी कांटे कि टक्कर कुणीच देऊ शकत नाही. तिचं आताच फोटोशूट पाहून तर कमेंट करणाराही दहावेळा विचार करेल.
उर्फी जावेदने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपले नवे फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये उर्फीने जीन्स पॅन्ट तर परिधान नक्कीच केली आहे. पण टॉप….? टॉपच्या जागी खुलती जुल्फे तिने परिधान केले आहेत. होय. मोकळ्या केसांच्या सहाय्याने छाती झाकून उर्फीने नवं फोटोशूट केलं आहे आणि कहर म्हणजे तिने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. आता फोटो शेअर केले आहेत तर ट्रोलिंगसुद्धा होणारच..! याहीवेळी ट्रोलर्सला एक भारी संधी मिळाली आहे ट्रोलिंगची.
उर्फी जावेदने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी ट्रोलिंगच्या माध्यमातून कमेंट्स केल्या आहेत. जवळजवळ २ लाखांहून अधिक लोकांनी उर्फीचे फोटो लाईक केले आहेत. तर ७ हजाराहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. यांपैकी बऱ्याच कमेंट्स ट्रोलर्सच्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे कि, चुकून कुणी पंखा लावू नका.
तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे कि, वडिलांचं आयुष्य निघून जातं मुलीला शिकवण्यात आणि मुलगी लागली आहे कपडे उतरवण्यात. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं कि, तरीपण रणवीर सिंगच्या मागेच आहेस.