Take a fresh look at your lifestyle.

अक्षय, सारा आणि धनुष’च्या ‘अतरंगी रे’चा अतरंगी ट्रेलर चर्चेत; 24 डिसेंबर रोजी ओटीटीवर होणार प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून राज्यात एक अनोखा आनंद पाहायला मिळतोय. हा आनंद आहे चित्रपट गृह खुली होण्याचा. कारण आता मनोरंजाचा फुल डोस लसीचे २ डोस घेतलेल्यांसाठी ५०% क्षमतेने उपलब्ध करण्यात आला आहे. यानंतर चित्रपटगृहात एक एक करून मनोरंजनाचे धमाके होत आहेत. अगदी काहीच दिवसांपूर्वी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा सूर्यवंशी चित्रपटगृहात आला आणि कोट्यवधींची कमाई करताना दिसला. अर्थात अजूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असताना आता खिलाडीच्या आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मात्र हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालणार आहे. डिस्नी हॉटस्टार वर प्रदर्शित होणारा बहुचर्चित ‘अतरंगी रे या चित्रपटाचा २४ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आनंद एल राय यांचा बहुप्रतीक्षीत आणि चर्चेत असलेला आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या अतरंगी रे’चा ट्रेलर सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. या चित्रपटात एक तिरंगी लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे.

यात अतरंगी भाषा असणारा धनुष आणि अतरंगी डोकेलिटी असणारी सारा यांचं जबरदस्ती लग्न होत जे दोघांनाही मान्य नसत. यातील रिंकू अर्थात साराला आधीपासूनच अक्षय आवडत असतो त्यामुळे ती तिच्या नवऱ्यासोबत दिल्लीत जाऊन वेगळे होऊ असं डील करते. यानंतर बदलतं सगळं गणित आणि कोण कोणाच्या कुठे कसं प्रेमात पडतं हे पाहायचं असेल तर हा अतरंगी चित्रपट पाहायलाच हवा.

डिस्नी प्लस हॉटस्टार वर येत्या २४ डिसेंबर २०२१ रोजी अतरंगी रे हा अतरंगी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा ओटीटीवर कल्ला होणार हे नक्की. हा चित्रपट गुलशन कुमार टी सिरीज, कलर यल्लो प्रोडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या निर्मितीतून तयार करण्यात आला आहे. हिमांशू शर्मा यांनी अतरंगी रे चित्रपटाचे लेखन केले आहे.

तर तनु वेड्स मनू रिटर्न्स व रांझना चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी केले आहे. तर चित्रपटातील गाणी हि इर्शाद कमील यांनी लिहिली आहेत. या ख्रिसमसला अतरंगी रे च्या माध्यमातून एक भन्नाट ट्रायो लव्हस्टोरी लवकरच प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे, यात काही वादच नाही.