ओह्ह माय मायला! ‘लंडन मिसळ’ काय आहे प्रकरण..?; मिशीवाल्या मुलीचा फोटो व्हायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मंगळवार दिनांक ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाची घोषणा करण्यात अली आहे. हि घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहीलेल्या एका नाटिकेवरून प्रेरित होत ‘ लंडन मिसळ’ या चित्रपटाची निर्मिती केल्याचे समजत आहे. तूर्तास या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. एक मुलगी या पोस्टरमध्ये दिसतेय. पण तिला चक्क पुरुषांसारखी मिशी आहे. त्यामुळे हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालतय. एबी इंटरनॅशनल प्रस्तुत व महाळसा एंटरटेनमेंट आणि ‘लंडन मिसळ’ लिमिटेड यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती अमित बसनेत, परी राणा, सुरेश गोविंदराय पै यांनी केली आहे. तर कार्यकारी निर्माते म्हणून धुरा सनीस खाकुरेल आणि सहयोगी निर्माती म्हणून वैशाली पाटील यांनी काम पाहिले आहे.
मुक्ता आर्ट्स लिमिटेड प्रस्तुत ‘लंडन मिसळ’ या अनोख्या शीर्षकाने आधीच प्रेक्षकांना ओढले आहे. यानंतर त्या मिशीवाल्या मुलीची जोरात चर्चा आहे. या चित्रपटाचे हे पहिले पोस्टर असून सोशल मीडियावर चांगलेच गाजते आहे. या पोस्टरमध्ये एका मुलीने पुतळ्यामागे लपून त्या पुतळ्याला आपल्या हाताने मिशी लावलेली दिसत आहे. हा नक्की कोणाचा चेहरा आहे आणि याचा नेमका अर्थ काय, हे सध्यातरी गुपित ठेवलेलं आहे. पण लवकरच या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु होईल आणि तेव्हा हळू हळू एका एका गोष्टीवरून पडदा उठेल. या वर्षाच्या शेवटी ‘लंडन मिसळ’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे अशी प्राथमिक माहिती मिळतेय.
‘लंडन मिसळ’ या कलाकृतीबद्दल बोलताना दिग्दर्शक जालिंदर गंगाराम कुंभार म्हणाले कि, ”यापूर्वी मी चित्रपट, मालिका केल्या आहेत आता बऱ्याच काळानंतर मी पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच सुभाष घई यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळत असल्याने ही माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. या चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर मराठी प्रेक्षकांना आवडेल असा आशय देण्याचा प्रयत्न मी ‘लंडन मिसळ’मध्ये केला आहे.”