ओ भाई मारो मुझे मारो! Adult फिल्म बनविताना उर्फी जावेद सापडली रंगेहात; पहा व्हिडीओ
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अतरंगी फॅशन सेन्समुळे नेहमीच सोशल मीडियावर कहर करणारी बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र यावेळी ती तिच्या बोल्ड अवतारामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. तिला नुकत्याच एका व्हायरल व्हिडीओमध्ये पाहिलं गेलं आहे आणि हा व्हिडीओ एका अडल्ट चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा आहे. या शुटिंगवेळी तिला पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर निर्माते रोहित गुप्ता यांनी शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये ऊर्फी एका ऑफिसमध्ये दिसतेय. जिथे ती एका चित्रपट निर्मात्याच्या भेटीसाठी आली आहे आणि हा एक सिक्रेट प्रोजेक्ट असल्याचं तो सांगत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरला व्हिलन म्हणून कास्ट केलं आहे असे तो सांगतो आणि हे ऐकून उर्फी या प्रोजेक्टबाबत उत्साहित होते. इतकंच काय तर चित्रपटात मुख्य नायक म्हणून विदेशी अभिनेत्याला कास्ट केल्याचंही तो सांगतो. शिवाय बादशाह या चित्रपटातील गाण्यांना संगीत देणार आहे अशी निर्माता बोलताना दिसतोय. त्यानंतर रोहित गुप्ता एका अभिनेत्याला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येतो. या अभिनेत्याला चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी कास्ट केल्याचे सांगितले जाते आणि उर्फी त्याला विचारणा करताना दिसते कि तू कुठला आहेस..? यावर तो युगांडाचा असल्याचे सांगतो.
पुढे निर्माता उर्फी आणि अभिनेत्यासोबत ऑडिशन व्हू करायला सांगतो. दरम्यान यासाठी तिला अतरंगी असे आश्चर्यकारक डायलॉग दिले जातात. शूटिंग सुरु होतेच तोवर एक पोलिस अधिकारी कार्यालयात दाखल होतो आणि अडल्ट चित्रपटाच्या शुटिंगसाठी तिथे उपस्थित असणाऱ्या तिघांना मारायला सुरुवात करतो. तेव्हा ते तिघे सर्व दोष उर्फीवर ढकलू लागतात. हे पाहून तीच डोकं फिरत आणि ती मॅनेजरवर चांगलीच भडकली. या संपूर्ण प्रकारामुळे हैराण झालेली उर्फी आपल्या मॅनेजरला फोन करते आणि तू मला कुठे पाठवलंयस..? अशी विचारणा करत रागावू लागते. त्यावर तिचा मॅनेजर हा सर्व प्रॅन्क असल्याचे सांगतो आणि उर्फीला डोळ्यासमोर तारे दिसू लागतात. म्हणजेच काय तर हा सर्व एक बनाव असून उर्फीसोबत प्रॅन्क करण्यात आला होता ज्याची ती शिकारही झाली होती. पण सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आणि नेटकरी हा व्हिडीओ चांगलाच एन्जॉय करत आहेत.