Take a fresh look at your lifestyle.

मराठी येत नसेल तर शिकून घ्या; पत्रकाराच्या वक्तव्याने उर्फीच्या चेहऱ्याचे उडाले रंग

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आपल्या अतरंगी फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी बिग बॉस ओटिटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती आपल्या फॅशनमध्ये नाही तर भाषेमुळे चर्चेत आली आहे. होय. रविवारी एका कार्यक्रमात उर्फिने तिच्या हटके अदा दाखवत सगळ्यांना वेड लावल. दरम्यान तिचा सामना जेव्हा पॅपराझींसोबत झाला तेव्हा भाषेचा विषय निघाला मग काय पत्रकारांनी तिला उलट सुलट प्रश्न विचारले पण उर्फिनेही कमाल उत्तर दिले आहे. तिने स्पष्ट सांगितले की मला मराठी येत नाही पण यापुढे ती काय म्हणाली ते जाणून घेऊ.

आपल्या अतरंगी स्टाईल मुळे चर्चेत असणाऱ्या उर्फीने रविवारी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तीने अतिशय वेगळा आणि हटके असा काचेचा ड्रेस परिधान केला होता. असं तर ती तिच्या वेगवेगळ्या लूकमूळे नेहमीच चर्चेत असते शिवाय ट्रोल सुद्धा होते. पण यावेळी काही वेगळाच किस्सा घडला आहे. या कार्यक्रमादरम्यान उर्फीला मराठीत बोलण्याची एका पत्रकाराने विनंती केली. यानंतर त्या पत्रकाराला परत उत्तर देताना उर्फी जावेद म्हणाली की, मला मराठी येत नाही, खूप थोडं थोडं मराठी बोलायला येतं. मग काय पत्रकारांनी फिरकी घ्यायला सुरुवात केली. त्या पत्रकाराने पुढे म्हटलं की, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायला पाहिजे. येत नसेल तर शिका.” यावर काही वेळासाठी उर्फी जावेद आश्चर्यचकित झालेली पहायला मिळाली.

याअगोदरसुद्धा एका मराठी डिजिटल माध्यमाच्या पॉडकास्ट मुलाखतीतही उर्फी जावेद हिला एका पत्रकाराने प्रश्न विचारताना म्हंटले होते की, तुला मराठी भाषा येते का..? तर असं विचारण्यात आल्या नंतर ऊर्फी यावर म्हणाली होती की, “यावेळी मला मराठी समजतं पण बोलता येत नाही, चुकीचं बोलण्यापेक्षा ते बोलू नये असं मला वाटतं. मी आधी शिकेन आणि मग बोलेन.” असं उर्फी तेव्हा म्हणाली होती.