Take a fresh look at your lifestyle.

फूल बने अंगारे! उर्फी जावेदचा फुलाफुलांचा ड्रेस पाहून नेटकरी संतापले; म्हणाले,

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अतरंगी आणि अँटिक स्टाईलमूळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद हि वारंवार ट्रोल होताना दिसते. कधी पारदर्शी कपडे तर कधी झालर लावलेले गाऊन फॅशन म्हणून अगदी बिंधास्तपणें उर्फी परिधान करते. इतकेच काय तर तिने परिधान केलेले कपडे ती पूर्ण विश्वासानीशी हॅण्डल करताना दिसते. तिची फॅशन हि स्वयंघोषित प्रसिद्ध आणि आयकॉनिक आहे.

आपल्या अतरंगी, चित्र विचित्र कपड्यांमुळॆ आपण ट्रोल होतोय याची तिला कधीच पर्वा नसते. यामुळे तिने नेहमीप्रमाणे याहीवेळी काही भलतीच फॅशन केली आहे. फक्त फुलांचा वापर करून तिने केलेलं फोटोशूट तिच्यासाठी खास असलं तरीही नेटकऱ्यांसाठी मात्र मनस्ताप झालं आहे. यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल होताना दिसतेय.

बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद हि सेफ्टी पिन, शर्टाच्या बाहि अशा ड्रेसनंतर आता कल्पनेच्या बाहेरील एका वेगळ्या ड्रेसमध्ये नेटकऱ्यांसमोर आली आहे. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने आपल्या शरीरावर वेगवेगळी रंगाची विविध फुले चिकटवली आहेत. जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या रंगातील फुलांचा वापर करून तिने एक वेगळाच लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फुले चिकटवून तयार करण्यात आलेला हा उर्फीचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिच्यावर टीकांचा मारा केला आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. तर अनेकांनी अर्वाच्य भाषेत आपली नापसंती दर्शवली आहे.

तसे पाहता उर्फी जावेद हि नेहमीच विविध फॅशन परिधान करण्याच्या नादात ट्रोल होताना दिसते. पण यावेळी युझर्सच्या संतापाचा उद्रेक झाला आहे नाही नाही त्या भाषेत उर्फीवर टीकांचा वर्षाव झाला आहे. दरम्यान या व्हिडिओवर एका युझरने लिहिले आहे की, आता बस्स.. आता खूप झालं तुझं. काहीही झालं तरी आता तुला अनफॉलो करायलाच पाहिजे. तर अन्य एका युझरने लिहिले आहे की, इस्लाम धोक्यात आहे. याशिवाय अभिनेत्री संभावना सेठ हिने उर्फीच्या पोस्टचे कौतुक केल्याबद्दल तिलाही नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.