फोटोफ्रेम बनून का फिरतेयस..?; उर्फीचा फोटो ड्रेस पाहून नेटकरी चक्रावले
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून प्रकाश झोपतात आलेली उर्फी जावेद हि तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना तिचा फॅशन सेन्स लाख आवडत असला तरीही अन्य नेटकरी मात्र तिचे कपडे पाहून नेहमीच चक्रावतात. यावेळीही असच काहीस झालं आहे. उर्फी जावेद हिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र यावेळी तिने जो ड्रेस परिधान केलाय तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. उर्फीने स्वतःच्याच फोटोंचा ड्रेस घातलाय आणि हे पाहून नेटकरी काय बोलू, काय नको अशा परिस्थितीत आहेत.
View this post on Instagram
उर्फी जावेद हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडीओ ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करते. याहीवेळी तिने स्वतःच्याच फोटोंचा ड्रेस परिधान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होतोय. या तिच्या अतरंगी व्हीडिओला पाहताना नेटकऱ्यांनी तोंडात बोट घातली आहेत. तर काहीं नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा चांगलंच भरडून ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने तर “उरलंयच काय जे फोटोने झाकतीयेस?” असा थेट सवाल उर्फीला केला आहे.
उर्फी जावेदने स्वत:च्याच फोटोंचा ड्रेस घातल्याचा तिला तर फार आनंद आहे हे या व्हिडिओतून दिसतंय. पण नेटकऱ्यांना काही फारसा आनंद झालाय असे वाटत नाही. या व्हीडिओला उर्फीने कॅप्शन दिल आहे कि, “तुम्ही खऱ्या उर्फीसोबत इभे आहात का? मलाही कल्पना इंटरनेटवर बघून सुचली, त्यामुळे मी असा व्हीडिओ शेअर करत तुमच्यासमोर आली आहे”. तिच्या या व्हिडिओला ६० हजारांहून अधिक लाईक आणि हजाराहून अधिक कमेंट्स मिळाले आहेत. उर्फीच्या बोल्ड अंदाजाला पसंत करणारा एक वेगळाच वर्ग आहे. तर ट्रोल करणारा दुसरा वर्ग.
उर्फीचा बोल्डनेस न आवडणारा, तिला नापसंत करणारा जो वर्ग आहे त्यातूनच ट्रोलर्स तयार झाले आहेत. जे नेहमी तिला ट्रोल करतात. यातील एका नेटकऱ्याने तिला “उरलंयच काय जे फोटोने झाकतीयेस?”, असा प्रश्न विचारलाय. तर दुसरा नेटकरी म्हणतो “हे काय फोटोफ्रेम बनून का फिरतेयस..?” असा सवाल केलाय. तर अन्य एकाने “अजब स्टाईल आहे तुझी…बाई” असं म्हटलंय. याशिवाय “आता तर हद्द झाली, काय कपडे घातले आहेस तू? तुला तरी कळत आहे का?” असे संतापत एका युजरने म्हटले.