हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमीच आपल्या अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी उर्फी जावेद याहीवेळी चर्चेत आहे. पण यावेळी कारण फारच वेगळं आहे. उर्फीने म्हणे नाव बदललंय.. नाही नाही.. फक्त नावाचं स्पेलिंग बदललं आहे. आता काय माहित.. तिच्या डोक्यात नक्की काय आहे. पण तिची इन्स्टा प्रोफाइल तिच्या नव्या नावाने अगदीच लक्षवेधी झाली आहे. तिच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काहीही संबंध नसताना तिने ‘O’ चा समावेश करून घेतलाय. आता यामुळे उर्फीला उर्फी म्हणायचं… कि यूओर्फी..? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
तसं पाहता ग्लॅमर इंडस्ट्रीत नेहमीचं अनेक सेलिब्रिटी आपलं नाव बदलताना दिसलेत. अगदी नावच काय तर नावाचं स्पेलिंगसुद्धा सोयीने बदलताना दिसले. याचा संबंध अनेकांनी आपले करिअर, उज्ज्वल भविष्य, रिलेशनशिप यांच्याशी लावला आहे. त्यामुळे बहुतेकदा मोठमोठे सेलिब्रिटी हे असं सगळं करताना दिसतात. याआधी उर्फीने Urfi असं नावाचं स्पेलिंग ठेवलं होतं.
त्यानंतर तिने Urrfi असं स्पेलिंग केलं आणि आता तर तिच्या नावाशी काहीही संबंध नसताना तिने ‘o’ चा स्पेलिंगमध्ये समावेश केलाय. यामुळे तीच नाव Uorfi असं झालंय. साहजिकच त्याचा उच्चारही बदलला आहे. पण उर्फीने या नव्या स्पेलिंगचा अर्थ चाहत्यांना इन्स्टा स्टोरीतून सांगितला आहे.
तिने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं आहे कि, ”मित्रांनो नमस्कार,मी माझं नाव आता अधिकृतरित्या बदलून UORFI असं ठेवलं आहे. त्याचा उच्चार उर्फी असाच असेल. फक्त स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. फक्त माझं इतकच म्हणणं आहे की लोकांनी आतापासून फक्त इतकंच ध्यानात ठेवायचं आणि हेच लिहायचं. आणि मी देखील ही गोष्ट आतापासून पुढे लक्षात ठेवीन”. आता यामुळे किमान नेटकऱ्यांनी तिला युओर्फी बोलायची गरज नाही हे स्पष्ट होत आहे. बहुतेक उर्फीला मनासारखे प्रोजेक्ट मिळत नाहीत आणि म्हणून मनासारखं करिअर करण्यासाठी तिने समजुतीपायी तिसऱ्यांदा नावाचं स्पेलिंग बदललं आहे.
Discussion about this post