Take a fresh look at your lifestyle.

उर्वशी ढोलकीया म्हणतेय, माझ्या स्वातंत्र्याचा सन्मान करणारा जोडीदार हवा; वयाच्या ४१व्या वर्षी करतेय लग्नाचा विचार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ओळखीचा चेहरा अभिनेत्री उर्वशी ढोलकिया आपल्याला माहीतच आहे. आजही उर्वशी कोमोलिका या भूमिकेच्या नावाने ओळखली जाते. स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका कसौटी जिंदगी की यामध्ये उर्वशी कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली होती. तिचा हा अभिनय लोकांना खूपच भावला होता. उर्वशीने बर्‍याच मालिकांमध्ये काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता उर्वशीबद्दल अशी माहिती मिळत आहे कि ती लवकरच लग्न करण्याचा विचार करतेय.

उर्वशीचे लग्न तिच्या वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी झाले होते. वयाच्या १९व्या वर्षी तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यानंतर पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर तीने एकटीनेच मुलांचा सांभाळ केला. पहिल्यांदाच तिने तिच्या लग्नाविषयी माहीती दिली आहे. यावर तिने सांगितले की,माझी मुलं मला नेहमीच लग्न करण्याचा किंवा कोणालातरी डेट करण्याचा सल्ला देतात. जेव्हा हे मुद्दे माझ्या समोर येतात तेव्हा मी जोरजोरात हसू लागते. काय विचार करू मी? असं नाहीये की माझं वय निघून गेलंय, पण एक वेळ अशी येते जेव्हा त्या पलीकडे मी एखाद्या विषयावर जास्त विचार नाही करू शकत.

लग्नानंतर अचानक घटस्फोट आणि त्यानंतर मुलांची जबाबदारी हे सारेच तिच्या एकटीच्या खांद्यावर होते. मुलांचा सांभाळ करण्यात तिने इतके स्वतःला झोकून दिले कि पुन्हा लग्न करायचा विचार तिच्या मनातच आला नाही. तिने मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. तिची मुले आणि आई वडील नेहमीच तिला स्वतःविषयी विचार करण्याचा सल्ला देत होते. तिने पुन्हा एकदा लग्न करून स्वतःचा विचार करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे उर्वशी तेव्हा नाही पण आता मात्र लग्नाचा विचार करू लागली आहे. आज उर्वशीने चाळीशी ओलांडली आहे मात्र प्रेम करायला आणि संसार थाटायला वयाचे बंधन थोडीच आहे.

उर्वशी काही वर्षांपूर्वी अभिनेता अनुज सचदेवाला डेट करत होती परंतु, काही वर्षांनी त्यांचा ब्रेकअप झाले होते. तिने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या लग्नाविषयीचे प्लॅन सांगितले आहेत. उर्वशी वयाच्या ४१व्या वर्षी लग्नाचा विचार करू लागली आहे. माझ्या स्वातंत्र्याचा सन्मान करणारा जोडीदार मला हवा आहे, तसा कोणी भेटला तर नक्कीच पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकेन असे ती म्हणाली.

Leave A Reply

Your email address will not be published.