Take a fresh look at your lifestyle.

उर्वशी रौतेला आणि गुरू रंधावा दिसणार लिपलॉक करताना; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गुरु रंधावा सोबत आगामी म्युझिक व्हिडिओ अल्बम “डूब गये” यात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने गुरू रंधावासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर त्यांचे अफेयर असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर समजले की हे सर्व त्यांच्या आगामी म्युझिक अल्बमच्या शूटिंगदरम्यानचे फोटो आहेत. दरम्यान आता समोर येणारी बातमी मात्र थोडी चक्क करणारी आहे. या गाण्यात उर्वशी आणि गुरू रंधावा लिपलॉक करताना दिसणार आहे अशी बातमी समोर येत आहे.

डुब गये या गाण्याचे दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी रेमो डिसूझाने केली आहे. तर बी- प्राकने हे गाणे लिहिले आहे. उर्वशी रौतेला सातत्याने डुब गये या गाण्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. त्यामुळे या गाण्याची तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला आणि गुरू रंधावा या गाण्यात फक्त रोमांसच नाही तर लिपलॉक करताना दिसणार आहेत. यामुळे गाण्याविषयी चाहत्यांमध्ये असणाऱ्या उत्सुकतेने परिसीमा गाठली आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला लवकरच इंस्पेक्टर अविनाश या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. सध्या ती या सीरिजचे शूटिंग पूर्ण करत आहे. यात तिच्यासोबत अभिनेता रणदीप हुडा दिसणार आहे. याशिवाय ती द्विभाषिक थ्रिलर सिनेमा ब्लॅक रोझ आणि तिरुत्तू पायले २च्या हिंदी रिमेकमध्ये देखील दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय ती इजिप्त्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत एका इंटरनॅशनल म्युझिक व्हिडीओ वार्साचेमध्येसुद्धा झळकणार आहे.