Take a fresh look at your lifestyle.

ट्रोल का ट्रेंडिंग पोल? फरहानने कोव्हीड व्हॅक्सिनच्या किमतीवर विचारलेल्या प्रश्नावर युजर्सच्या आल्या संमिश्र प्रतिक्रिया

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना व्हायरसचा कहर इतका प्रचंड वाढला आहे कि आता रुग्णांच्या संख्येसमोर व्हॅक्सिन कमी पडू लागले आहेत. त्यात कोविशिल्ड व्हॅक्सिनची किंमत वाढली आहे. सरकारने देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याची मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने खाजगी रुग्णालयांत ६०० रुपयांना व्हॅक्सिन देण्याची घोषणा केली आहे. या व्हॅक्सिन बाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत नाराजी व्यक्त करताना अभिनेता फरहान अख्तर याने सिरम इन्स्टिट्यूटला भारतामध्ये व्हॅक्सिन महाग का आहे? अशी थेट विचारणा केली. मग काय काही युजर्सने त्याला भरभरून ट्रोल केले तर काहींनी त्याला पुरता पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे समजणे कठीणच झाले आहे कि, फरहान नक्की ट्रोल होतोय का ट्रेंडिंग पोल वर झळकतोय.

कोरोना व्हॅक्सिन १८ वर्षांवरील व्यक्तीला सरकारी हॉस्पिटलमध्ये ४०० तर खासगी रुग्णालयांमध्ये ६०० रुपयांना मिळणार आहे. केंद्र सरकारला मात्र हे व्हॅक्सिन पूर्वीप्रमाणेच १५० रुपयाला मिळणार आहे. कोरोना व्हॅक्सिन यापूर्वी फक्त केंद्र सरकारच खरेदी करत होते. मात्र आता राज्य सरकारही व्हॅक्सिन खरेदी करू शकणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अभिनेता फरहान अख्तरने या विषयावर नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर सिरम इन्स्टिट्यूला थेट प्रश्न विचारला आहे. भारतामध्ये अन्य कोणत्याही देशापेक्षा व्हॅक्सिन महाग का आहे? अशी विचारणा फरहानने केली आहे.

दरम्यान फरहानच्या या ट्विट्सवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी फरहानला रोकठोक पाठिंबा दिलाय. तर काही युझर्सनी त्याला या विषयावरही ट्रोल करायची संधी सोडलेली नाही. ही किंमत फक्त खाजगी रुग्णालयांसाठीच आहे, ते तुला समजणार नाही अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. फरहान अख्तर यापूर्वी स्काय इज पिंक या सिनेमात दिसला होता. आता त्याचा उडान हा चित्रपट लवकरच अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर मार्व्हल स्टुडिओच्या मिस मार्व्हल या सिनेमातही तो दिसणार आहे.