Take a fresh look at your lifestyle.

मोठ्या विश्रांतीनंतर वहिनीसाहेब इज बॅक; अलौकिक पात्राचा लूक पाहून चाहते भारावले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लहानपणी आजी आजोबा खूप गोष्टी सांगायचे. त्यात विशेष गोष्टी असायच्या देवांच्या आणि भुतांच्या. त्यामुळे आता जेव्हा टीव्ही मालिकांच्या माध्यमातून या कथा वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात तेव्हा अनोखे फिलिंग आपण अनुभवत असाल. अश्याच रोमांचक आणि अध्यात्मिक चातुर्मासाच्या गोष्टी, भक्ती कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना झी मराठीवरील ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रमातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम म्हणूनच प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या कार्यक्रमात आता लवकरच नवरात्री विशेष भाग रंगणार आहेत आणि याच भागांमध्ये तुझ्यात जीव रंगला मालिकेतील लाडक्या वाहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री कडगांवकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

अभिनेत्री धनश्री कडगांवकर याआधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली आहेत. विविध पात्रांच्या सहाय्याने तिने आपला असा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पण आता ती एका पौराणिक मालिकेतून चक्क महिषासुराचा वाढ करणाऱ्या दुर्गा मातेच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यात धनश्री मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिचे चाहते आणखीच उत्सुक दिसत आहेत.

दरम्यान धनश्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिचा भारदस्त आणि लक्षवेधी लूक अत्यंत कौतुकास्पद आहे. हा लूक पाहून तिचे चाहते अक्षरशः भारावले आहेत.

या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, ‘माझ्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. मध्ये मोठा गॅप आल्यामुळे मला पुन्हा काम करता येईल की नाही, मी काही विसरली तर नाही ना अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या. पण मला माझ्या कुटुंबाकडून आणि या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. ‘घेतला वसा टाकू नको’ असं मी माझ्या मनाशी पक्के करून हि भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.’