Take a fresh look at your lifestyle.

‘प्रेमाचा विजय होईल हीच आशा’; रशिया- युक्रेन युद्धावर बॉलिवूड जगतातून विविध प्रतिक्रिया

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या जगातील दोन देशांमध्ये अत्यंत भयावह असे युद्ध सुरु आहे. हे दोन देश म्हणजे रशिया आणि युक्रेन. या दोन देशांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून प्रलयकारी वातावरणात युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये रशियाची युक्रेनवर चढत आहे. रशियाने आक्रमण करून आतापर्यंत युक्रेनच्या अत्यंत महत्वाच्या भागांवर कब्जा मिळवला आहे. यामध्ये युक्रेनच्या राजधानीचादेखील लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे.

युक्रेनच्या चेरनोबिल आणु प्रकल्पावर रशियाने कब्जा मिळवल्याच्या वृत्ताला युक्रेनच्या पंतप्रधानांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवित हानी झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकल्यामुळे भारत सरकार त्यांना वाचविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. यात आता बॉलिवूड जगतातून याप्रकरणी विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.

सध्या या युद्धामुळे समोर येतंय कि, जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणत राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे रशिया- युक्रेन युद्धावर बॉलिवूड क्षेत्रातून काही कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेता सोनू सूद आणि लेखक व राजकारणी शशी थरूर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया देताना ट्विट केले आहे. यात तिने लिहिले कि, “सध्या जागतिक पातळीला जे युद्ध सुरू आहे. त्याभोवती जे राजकारण सुरू आहे ते सिनेमातील गोष्टीसारखं वाटत आहे”.

तर अभिनेता सोनू सूदनेही आपली प्रतिक्रिया ट्विटमधून दिली आहे. दरम्यान त्याने अडकलेल्या भारतीयांविषयी काळजी व्यक्त केली आहे. सोनुने लिहिले कि, “युक्रेनमध्ये १८ हजार भारतीय नागरिक अडकले आहेत. मला खात्री आहे की त्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल. भारतीय दुतावासाला माझी विनंती आहे की, त्यांना लवकरात लवकर भारतात परत आणावं. या अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो”.

याशिवाय लेखक आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांनी युक्रेन -रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केले आहे. त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत युक्रेनियन ध्वज पाठिवर घेतलेल्या पुरुषाने रशियन ध्वज असलेल्या महिलेला अलिंगन दिले आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले कि, “युद्ध आणि संघर्षावर प्रेमाचा विजय होईल अशी आशा करुया”.