Take a fresh look at your lifestyle.

कॉमेडीचा डबल डोस ; वरुण धवन – साराचा कुली नं 1 चा ट्रेलर प्रदर्शित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘कुली नं १’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते परेश रावल यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. एक असे वडील जे आपल्या मुलीचं लग्न एका मोठ्या आणि श्रीमंत घरातील मुलासोबत करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात. चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि रोमांसचा परिपूर्ण पॅकेज असल्याचं दिसून येत आहे.

कुली नं १ चित्रपटात परेश रावल सारा अली खानच्या वडीलांच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले आहे. यात वरूण धवन वेगवेगळ्या भूमिकेत दिसतो आहे. तर पोलिसाच्या भूमिकेत जॉनी लिव्हर कॉमेडी करताना दिसतो आहे. तो राजू कुलीचा पर्दाफाश करताना दिसतो आहे. चित्रपटातील गाणी देखील दमदार झाली आहे. चित्रपटाची कथा गोविंदा आणि करीश्मा कपूर अभिनीत कुली नं १ पेक्षा थोडी वेगळी आहे. जिथे गोविंदा बस डेपोमधील कुली असतो तर इथे वरूण धवन रेल्वे स्टेशनचा कुली दाखवला आहे.

दुसरीकडे साराचा ग्लॅमरस अंदाज आणि वरूणचा कॉमिक टाइमिंग कमालच वाटत आहे. शिवाय सारा आणि वरूणमधील रोमाँटिक केमिस्ट्री चाहत्यांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक डेविड धवन यांनी केले असून त्यांचा हा ४५वा चित्रपट आहे. ‘कुली नं १’ हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.