Take a fresh look at your lifestyle.

वरून धवनचा ‘कुली नं. १’ या दिवशी होणार प्रदर्शित

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘कुली नं. १’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली असून येत्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

वरुण धवनने ट्विट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत केली आहे. ‘कुली नं. १ हा चित्रपट येत्या ख्रिसमसला अॅमोझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे’ असे त्याने म्हटले आहे.

हा चित्रपट १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशभर संचारबंदी झाली होती त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री सारा अली खान देखील झळकणार आहे. सारा आणि वरुणला एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.