Take a fresh look at your lifestyle.

श्रद्धाने वरुणला का लगावली चपराक ; पहा व्हायरल व्हिडीओ

दिल्‍ली । बॉलीवुड एक्‍टर वरुण धवन आणि श्रद्धा कपूर  ही जोडी पुन्हा एकदा ‘स्ट्रीट डांसर 3 डी’ मध्ये दिसणार आहे. वरून आणि श्रध्दा यांचा ‘स्ट्रीट डांसर’ चित्रपट या महिन्यात २४ जानेवारीला रिलीज होत आहेत. पण अलीकडेच वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रथमदर्शनी असे दिसून येत आहे कि दोघांमध्ये काहीतरी घडले आहे.

इतकेच नाही, तर व्हिडिओमध्ये श्रद्धाने वरूणला कानशिलात लागवली आहे. त्यानंतर लगेच वरुणनेही श्राद्धाच्या कानशिलात लगावली आहे. त्यादोघांमध्ये असे काय घडले की ते एकमेकाला कानशिलात लगावत आहेत. व्हिडीओ बघितल्यावर असे समजते की ते त्यांच्या येणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचे दिसून येत आहे.

वरुण आणि श्रद्धा यांनी एबीसीडी- २ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. श्रध्दाने एका शोमध्ये बोलतांना सांगितले होते की वरूण तिला लहानपणापासून आवडत होता आणि आजही तो तिच्यासाठी खास आहे. तिला त्याच्या सोबत काम करायला नेहमीच आवडते. मग असे काय घडले कि त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. नक्की काय आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.