Take a fresh look at your lifestyle.

वरून – श्रद्धाचा डान्स मुकाबला ! ‘स्ट्रीट डान्स ३डी’चा ट्रेलर लाँच

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन । १०० वर्षे जुन्या भारतीय चित्रपट सृष्टीतील एकमेव डान्स जॉनरच्या श्रेणीतील फिल्म्सची सिरीज म्हणजे ABCD – Anybody can dance. यातीलच पुढचा भाग म्हणजे वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’. या चित्रपटात डान्सचा सर्वात मोठा मुकाबला दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच ट्रेलर रिलीज केला.

पेट्रीयोटिक सिनेमांची लाट आलेली असताना, त्याच फ्लोमध्ये या चित्रपटात भारत पाकिस्तानचा विषय (घुसडला) वापरला आहे वरुण, श्रद्धा आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये आपण प्रभूदेवा मुक्काबाला मुकाबाला या गाण्यावर नाचताना आणि 90 च्या दशकाच्या मुलांना तोंडात बोटं घालायला लावणार आहे. वरुणच्या आवाजात ट्रेलरची सुरुवात होते. तो म्हणतो, “भारत और पाकिस्तान, चाहे क्रिकेट में हो या डान्स बॅटल में, मज़ा तो आएगा।”

चित्रपट २४ जानेवारी २०२० ला रिलीज होणार असून ट्रेलरमध्ये हॉलिवूड चित्रपटाच्या अंतिम दृश्याची आठवणही येते (कॉपी कोण म्हणालं), जिथे स्पर्धक पाण्यात नाचतात. ट्रेलर गमतीशीर आणि भावनिक क्षणांचे मिश्रण आहे. अमेरिकेतील भारत आणि पाकिस्तानच्या स्थलांतरितांवरही भाष्य केले आहे. चित्रपटातील एनर्जी तुमहाला दिपवून टाकते.

 

Leave a Reply

%d bloggers like this: