Take a fresh look at your lifestyle.

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील नामांकित दिग्दर्शक वेंकट प्रभू करणार बॉलिवूडमध्ये एंट्री

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील मानाडू हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून भारतभर गाजतोय. यानंतर त्याचे ओटिटी रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी आणखीच पसंती दिली आहे. हा चित्रपट सायन्स थ्रिलर असून याचे दिग्दर्शन प्रसिध्द दिग्दर्शक वेंकट प्रभू यांनी केले आहे. मानाडू या चित्रपटाची पसंती पाहता हा चित्रपट बॉलिवूड मध्ये यावा यासाठी ते स्वतः पुढाकार घेत बॉलिवूड मध्ये एंट्री करणार आहेत.

याविषयी सांगताना वेंकट म्हणाले की, तमिळ, मल्याळम, मराठी या भाषांमध्ये उत्तम चित्रपट निर्मिती होते. या चित्रपटांचा ऐवज फार वेगळा असतो. जसे की, मानाडू हा त्या राज्यातील परिस्थिती मांडणारा चित्रपट आहे. तो तमिळ भाषेत असून त्याला सब टायटल आहेत. पण हा चित्रपट जर हिंदी भाषेत आला तर तो जगभर पोचेल. यासाठी उत्तम उदाहरण म्हणाल तर सैराट. सांगायचे हे की चित्रपट हिंदी वा इंग्रजी भाषेत बनवला तर तो जगभरातील लोक पाहू शकतात म्हणूनच मी हिंदी चित्रपटसृष्टीत येतोय.

वेंकट प्रभू हे उत्तम दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखक आहेत. ते ज्येष्ठ संगीतकार इलया राजा यांचे पुतणे आहेत. वेंकट यांचे सरोजा, गोवा, मनकथा, बिर्याणी, चेन्नई -६०००२८ हे चित्रपट अत्यंत गाजले आहेत.