Take a fresh look at your lifestyle.

मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांचा ‘महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्काराने होणार सन्मान

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रातील सर्जनशील व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी मुंबईत महाराष्ट्राची गिरीशिखरे पुरस्कार सोहळा २६ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. १ मे १९६० आधी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठी भाषिक लोकांचे हक्काचे राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती होईपर्यंत जवळपास दीड दशकाचा इतिहास रचला गेला. यातील महत्त्वाच्या खुणांपैकी एक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. या कार्यक्रमात शास्त्रीय व लोक कलाकारांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल.

हा सोहळा अतिशय नेत्रदीपक असेल यात काही शंकाच नाही. मराठी सांस्कृतिक मेजवानीसह हा कार्यक्रम जल्लोशात साजरा होईल. सूत्रानुसार, या कार्यक्रमाचे आयोजन २६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ०३.०० ते रात्री १०.०० या वेळेत मुंबईतील रंगशारदा नाट्यमंदिर, लीलावती हॉस्पिटलजवळ, वांद्रे (प.) येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज कलाकार आणि विविध क्षेत्रातील माननीय व्यक्तींची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमामध्ये अमोल पालेकर, सुनील गावस्कर, रोहिणी हट्टंगडी, भीमराव पांचाळे, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर, अनिता डोंगरे, आशा खाडिलकर आणि तेजस्विनी सावंत यांसारख्या दिग्गजांना मानांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हे अवॉर्ड महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येतील. कार्यक्रमात देण्यात येणारा आणि अवॉर्ड गॅलरीने खास डिझाईन केलेला अवॉर्ड अत्यंत लक्षवेधी आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. तसेच या शुभप्रसंगी विविध क्षेत्रातील पन्नास नामवंतांना ‘महाराष्ट्राची गिरिशिखरम’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पन्नास व्यक्तिमत्त्वांपैकी वीसहून अधिक व्यक्तींना भारत सरकारने नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.