Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध दिग्दर्शक रवि टंडन यांचे निधन; लेक रविना टंडनने भावुक होत केली पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनचे वडील आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवि टंडन यांचे निधन झाले आहे. दरम्यान ते ८७ वर्षाचे होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोपही. याबाबत त्यांची लेक रविना टंडन हिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने आपल्या वडिलांसोबतचे काही फोटो शेअर करीत कॅप्शन मध्ये अत्यंत भावुक मेसेज लिहिला आहे. हि पोस्ट पाहून तिचे चाहतेही भावुक झाले आहेत आणि अनेकांनी यावर भावपूर्ण श्रद्धांजली अश्या कमेंट्स केल्या आहेत.

 

बॉलिवूड अभिनेत्री आणि रवि टंडन यांची कन्या रविना टंडन हिने इंस्टाग्राम आणि ट्विटर अशा सोशल मीडियावर वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे. सोबतच भावुक होत काही पोस्ट केल्या आहेत. इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये रविनाने तिच्या वडिलांसोबतचे फोटो शेअर करीत लिहिले कि, “बाबा, तुम्ही नेहमी माझ्यासोबत असेच चालत असाल. मी नेहमी तुमच्यासारखंच राहण्याचा प्रयत्न करत राहिन. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. लव्ह यू बाबा”. यानंतर अनेकांनी या पोस्टवर शोक व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांचा समावेश आहे.

याशिवाय ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये रवीनाने लिहिले कि, माझे प्रिय वडील आज सकाळी त्यांच्या स्वर्गीय अवस्थेत परतले. ते माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी शक्तीचा आधारस्तंभ होते. आम्ही या कठीण काळात जात असताना, तुम्ही केलेले सांत्वन, कळकळ आणि आधारासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. ओम शांती! रविना आणि तिच्या बाबांच खास नातं वडील-मुली पेक्षा मित्र-मैत्रिणीचं अधिक होतं. रविना बाबांच्या खूप जवळ असल्यामुळे त्यांच्या जाण्याने ती अतिशय दुःखी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Movie Talkies (@movietalkies)

रविना टंडनचे वडील रवि टंडन हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील नामांकित आणि प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. नजराना, मुकद्दर, मजबूर, निर्माण ही त्यांच्या निवडक चित्रपटांची नवे आहेत. हे चित्रपट ज्या त्या काळात गाजले होते. याशिवाय त्यांनी अनहोनी आणि एक मैं और एक तू या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. आज रवि टंडन यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी वीणा टंडन, मुलं रवीना आणि राजीव अशी दोन मुलं आहेत. तर रविना अभिनेत्री आहे आणि राजीव दिग्दर्शक तसेच निर्माता आहेत.