Take a fresh look at your lifestyle.

संगीत सृष्टीचे मोठे नुकसान; हार्ट अटॅकसह मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे ज्येष्ठ गायिकेचे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच लता दीदींच्या निधनामुळे संगीत सृष्टीवर शोककळा पसरली होती. यानंतर दुःखातून आता कुठे सावरत असतानाच बॉलिवूडचे पॉप सिंगर बप्पी लहरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त आज समोर आले. त्यामुळे सिनेसृष्टीपासून अगदी क्रीडा सृष्टीपर्यंत सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. यातच आता संगीत कला विश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ बंगाली गायिका संध्या मुखोपाध्याय यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आणि संगीत विश्वात आणखीच दुःखाची लाट उसळली.

भारतीय कलाविश्वाला गेल्या २ वर्षांपासून मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान एकामागे एक निधन वार्तांमुळे संगीत कलाविश्व शोकमय झाले आहे.

यात आता बंगालच्या ज्येष्ठ गायिका संध्या मुखोपाध्याय यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगाली गायिका संध्या मुखोपाध्याय यांचे हृदय विकाराच्या झटक्यामूळे निधन झाले आहे. दरम्यान त्या ९० वर्षांच्या होत्या. गायिका संध्या मुखोपाध्याय यांचे निधन झाले असल्याची माहिती मिळताच संपूर्ण बंगाल संगीत विश्वावर शोककळा पसरली. या वृत्तास रुग्णालयाने दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संध्या यांची प्रकृती नाजूक होती. त्यामुळे संध्या यांना जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णालयात दाखल केलं होतं. माहितीनुसार संध्या मुखोपाध्याय यांना कोरोनाची लागण झाली होती. शिवाय त्यांना हृदयासंबंधित अनेक आजार होते. दरम्यान मंगळवारी संध्याकाळी जवळपास सात वाजण्याच्या सुमारास संध्या यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.

तसेच त्यांचे अनेक अवयव एकाचवेळी निकामी झाल्यामुळे उपचार अपयशी झाले आणि अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायिका संध्या मुखोपाध्याय यांनी एस.डी.बर्मन, नौशाद आणि सलिल चौधरी यांसारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत अव्वल काम केले आहे. त्यामुळे संध्या मुखर्जी नेहमीच आपलया कलेतून जिवंत असतील अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली आहे.