Take a fresh look at your lifestyle.

विकी- कॅटच्या लग्नानंतरची पहिली होळी बोले तोह फुल्ल टु कलरफुल्ल; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड बी टाऊन कपल अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचं लग्न अगदी शाही पद्धतीने झालं. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत यांनी आपले लग्न पार पाडले आणि यानंतर आता लग्नानंतरची पहिली वहिली होळी त्यांनी सेलिब्रेट केली आहे. दरम्यान रंग खेळतानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून त्यांचे चाहते देखील कलरफुल शुभेच्छा देताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. यामध्ये विकीची फॅमिली देखील दिसतेय.

अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे त्यांच्या लग्नानंतरची पहिली होळी साजरी करत आहेत. विकीआणि कॅटरिना कौशल यांनी आपल्या फॅमिलीसोबत मस्त कलर खेळले आहेत. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर हे फोटोही शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर आणि फोटोंवर काही मिनिटांमध्ये कमेंट्सचा पाऊस पडला आहे. चाहत्यांनीही या दोघांना भरभरून होळीच्या रंगबेरंगी शुभेच्छा दिल्या आहेत. मिस्टर आणि मिसेस कौशल यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये या दोघांसह विकीचा भाऊ अभिनेता सनी कौशल, आई वीणा कौशल आणि वडील शाम कौशल दिसत आहे.

यातील एका फोटोमध्ये सासूबाई वीणा कौशल प्रेमाने कॅटरिनाला रंग लावताना दिसत आहेत. तर यावर चाहत्यांनी कमेंट केली आहे की, ‘वीणा आंटी खूप क्युट आहेत.’ तर काहींनी कॅटरिना आणि वीणा यांचं नाव टॅग करत हार्ट इमोजी शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना कॅटरिना आणि विकी यांनी ‘Happy Holi’ असं कॅप्शन दिल आहे. डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमधील बरवाडा किल्ल्यावर विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी अगदी मोठ्या थाटात पण मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं.