Take a fresh look at your lifestyle.

विकी कौशलसोबत विवाह करणार हि निव्वळ अफवा; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉलिवूड जगतात एक वेगळीच घाई गडबड दिसतेय. जिला सर्वसामान्यांच्या भाषेत लगीन सराई असे म्हणतात. होय. अलीकडेच रणबीर आणि आलियाचा विवाह सोहळा येत्या डिसेंबरमध्ये पार पडणार अशी बातमी आली आहे तर मग विकी कौशल आणि कॅटरिना कैफ कसे मागे राहतील? यामुळे अनेको माध्यमांमध्ये विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार असून त्यांच्या विवाहाचे स्थळ देखील घोषित करण्यात आल्याच्या अनेको बातम्या प्रसारित झाल्या. यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या विवाहाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. असे असताना अखेर आता अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने आता या विषयावर आपले मौन सोडले आहे.

आधी कथित रिलेशनशिप आणि आता थेट विवाह सोहळा? यामुळे वैतागून आता अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने मौन सोडत माध्यमांशी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान विवाहाच्या चर्चांवर बोलताना कॅटरिना म्हणाली कि, ” लग्न वगैरे या सगळ्या अफवा आहेत. यात काहीही तथ्य नाही.” मग काय? आता स्वतः कॅटरिना सांगतेय कि अफवा आहे म्हट्लयावर विकी आणि कॅट यांच्या विवाहाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील सवाई माधवपूर येथे विवाह करणार असल्याच्या सोशल मीडियावर चांगल्याच जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. हे दोघेही आपल्या विवाहाच्या तयारीस लागले आहेत असे वृत्त बुधवारी आले होते आणि त्यांची लग्नासाठीची तयारी जोरात सुरु आहे असे यात नमूद केले होते.

दरम्यान विवाहासाठी परिधान करायची वस्त्रे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी हे डिझाईन करीत आहेत, अश्यादेखील चर्चा होत्या. वांद्रे स्थित सेलिब्रिटी मॅनेजर रश्मा शेट्टी यांच्या कार्यालयात विकी आणि कॅटरिना एकत्र आले होते. तेव्हापासून या दोघांच्या विवाहाच्या चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय अलीकडे काही दिवसांपूर्वी विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी गुपचूप आपल्या नातेवाईक आणि मित्र मंडळींसोबत साखरपुडा उरकला आहे अश्याही अनेको चर्चांना उधाण आले होते. पण आता कॅटरिनाने दिलेल्या माहितीनुसार या अफवा आहेत तर कदाचित या चर्चांवर कुठेतरी याचा परिणाम दिसून येईल.