Take a fresh look at your lifestyle.

धनुषच्या ‘राउडी बेबी’वर कॅटरीनाच्या अहोंनी केला भन्नाट डान्स; व्हिडिओ झाला व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ यांचं लग्न कमाल गाजल होत. यानंतर विकी कौशलच्या आयुष्यात जणू आनंदाची लहर आली आहे. तेव्हापासून विकी आणि कॅट दोघेही सातव्या आस्मानावर आहेत. ते नेहमीच आपला आभाळाएवढा आनंद त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतात. यानंतर सध्या सोशल मीडियावर विकी कौशलचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विकी धनुषच्या रावडी बेबी गाण्यावर नाचतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

कॅटरीना कैफसोबत लग्न केल्यापासून विकी एवढा खूश दिसत आहे की त्याचा आनंद तो या व्हिडीओतून व्यक्त करतोय अस वाटतं आहे. अनेक नेटकरी या व्हिडिओ वर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देणाऱ्या कमेंट करीत आहेत. माहितीनूसार, लग्नानंतर विकी कौशल त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. विकीने हा व्हिडिओ त्याच्या सेटवरुनच चाहत्यांसोबत शेअर केला आहे. दरम्यान, विकीला थोडा वेळ मिळताच त्याने हा व्हिडिओ बनवला आहे. दुसरीकडे चाहत्यांनी विकीच्या डान्ससोबत कॅटरिनाचं कनेक्शन जोडलं आहे.

 

 

विक्की कौशलने याआधी कॅटरिनासोबतचा एक फोटो शेअर केला होता जो त्यांच्या लग्नाच्या फंक्शनचा होता. फोटोत, विकी कॅट एकत्र डान्स करत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिलं आहे की, ‘कायमचे एकत्र. ख्रिसमसच्या मुहूर्तावर विकीने कॅटसोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि यात त्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आत्तापर्यंत विकी आणि कॅट दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर खूप फोटो शेअर केले आहेत.