Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानने सहकुटुंब केली श्रीगणेशाची आरती ; पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेता सलमान खान अतिशय उत्साहात दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. यावेळीही त्यांने गणपतीची मूर्ती घरी बसविली आहे. सलमान खानचे संपूर्ण कुटुंब भगवान गणेशाच्या पूजेमध्ये गुंतले आहे. दरम्यान, सलमानचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान, वडील सलीम खान, सलमा, हेलन, अरबाज खान, सोहेल खान आणि कुटुंबातील इतर लोक श्रीगणेशाची आरती करताना दिसत आहेत. त्याचवेळी आयुष शर्मा आपल्या मुलांना बाहूमध्ये घेत गणेश आरती करताना दिसला. खूप लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.

याशिवाय अतुल अग्निहोत्रीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात सलमानची बहीण अर्पिताची दोन्ही मुले गणेश मूर्तीच्या जवळ बसलेली दिसत आहेत. सलमान खान लवकरच बिग बॉस 14 चे होस्ट करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शोचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला होता ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता नुकताच शोचा दुसरा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’