Take a fresh look at your lifestyle.

अरे कायका ब्रेकअप..? मलायका आणि अर्जुन गेले क्लासी लंच डेटवर; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त गाजलेले कपल विभक्त झाल्याची चर्चा सुरु होती. हे कपल म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर. जवळ जवळ आठवडाभरापासून यां दोघांचं ब्रेकअप झाल्याची नुसतीच चर्चा सुरु होती. मुख्य म्हणजे यानंतर दोघांनीही माध्यमांना सांगितले होते कि, चालू असलेल्या चर्चेत काहीही तथ्य नाही. पण कुणी विश्वास ठेवेल तर खरं.. यानंतर अखेर पुन्हा एकदा मलायका आणि अर्जुन दोघंही एकत्र दिसले आहेत. त्यामुळे बिचाऱ्या अफवा पसरवणाऱ्यांची मेहनत वाया गेली आहे. तर मलायका आणि अर्जुनचे चाहते आनंदी झाले आहेत.

 

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बी टाऊन कपल नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असत. त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याची बातमी नुसती वाऱ्यासारखी पसरली होती. यानंतर अखेर या दोघांना एकत्र व्हिडिओ पाहून अफवांवर रोख बसला आहे. रविवारी दोघांनीही एकत्र क्लासी लंच डेट एन्जॉय केली आहे. दरम्यान रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईतील वांद्रे येथील रेस्टॉरन्टबाहेरचा आहे. एका क्लासी रेस्टोबाहेर या कपलला पँपराझींनी स्पॉट केलं. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने या कपलचा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघेही एकत्र दिसत आहेत. नुसते एकत्र नव्हे तर दोघेही आनंदी देखील दिसत आहेत. यावेळी मलायकाने रफल्ड व्हाइट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये मलायका अतिशय सुंदर दिसत होती. तर अर्जुनने निळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि डेनिम परिधान केले होते. त्यामुळे अर्जुन देखील अगदी हँडसम हंक वाटत होता. त्यामुळे साहजिकच मीडियाच्या कॅमेरांचे लक्ष वेधून घेण्यात हे कपल पुन्हा एकदा यशस्वी झालं आहे. याशिवाय ते दोघेही नेहमीच आपलं प्रेम जगासमोर बिन्दास्त व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे हे कपल चर्चेत नाही असा एकही दिवस जात नाही.