हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची उलाला गर्ल अभिनेत्री विद्या बालन गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यावर दिसलीच नाही. शेरनी नंतर तिचा कोणताही चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटीवर प्रदर्शित झालेला नाही. पण म्हणून तिचा सगळ्यांना विसर पडला असे मुळीच नाही. कारण विद्या बालन सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. याच्या माध्यमातून ती विविध फोटो आणि कॉमिक रिल्स शेअर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिचा असाच एक कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावरून तिला ट्रोल केलं जात आहे.
अभिनेत्री विद्या बालनचा हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इंस्टाग्राम पेजने शेअर केला आहे. हा एक कॉमेडी रील व्हिडीओ असून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत ती एका ट्रेंडी डायलॉगवर लिपसिंक करतेय आणि गुगलला एक गाणं वाजवण्याची सूचना देते. पण तिची सूचना ऐकून गुगल असिस्टंट भन्नाट रिप्लाय देते. यामध्ये विद्या हातात फोन पकडून म्हणते, ‘हॅलो गूगल, अभी जिंदा हू तो जी लेने दो, जी लेने दो, भरी बरसात मे पी लेने दो, मुझे तुकडो मे नहीं जीना है, कटा कतरा को नही पिना है, ये वाला गाना सुनाओ’. यावर तिला गुगल असिस्टंट रिप्लाय देतं म्हणते कि, ‘दो ही लाईन बची है तू ही गा ले’ अर्थात ‘दोनचं ओळी उरल्या आहेत.. त्या पण तूच गाऊन घे’.
हा व्हिडीओ पाहून खरंतर हसायला काही हरकत नव्हती. पण काही नेटकऱ्यांनी विद्याला अशा कॉमेडी रिल्स बनविण्यावरून ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘या लोकांकडे पण आता काय काम धंदा उरलेला नाहीये.. म्हणून तर रिल्स बनवत बसलेत’.
तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘एव्हढं सगळं करण्यापेक्षा एखादा पिच्चरचं केला असतास तर बरं झालं असत’. आणखी एकाने लिहिलं आहे कि, ‘आमच्या माहितीप्रमाणे आयफोनमध्ये सिरी असते’. विद्या चित्रपटांपेक्षा कॉमेडी रिल्स करण्यात व्यस्त असल्याचेही काहींनी म्हटले आहे. पण आता विद्या ‘शेरनी’ आणि ‘जलसा’ या चित्रपटानंतर लवकरच अनू मेनन दिग्दर्शित ‘नियत’ या चित्रपटात दिसणार आहे.
Discussion about this post