Take a fresh look at your lifestyle.

‘आम्हालापण डोळे शेकू द्या ना..’; रणवीरच्या Nude फोटोशूटवर विद्या बालनची हटके प्रतिक्रिया

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट व्हायरल होताना दिसलं. अनेकांनी या फोटोशूटनंतर रणवीरला समर्थन दिलं तर अनेकांनी त्याला फटकारलं. चाहत्यांनीही आपली नाराजी दर्शवली. यानंतर एका समाज सेवकाने मुंबईत चेंबूर पोलीस ठाण्यात रणवीरविरोधात FIRसुद्धा दाखल केली. दरम्यान सोशल मीडिया कितीही पेटूदे पण आमचं समर्थन रणवीरलाच अशी भूमिका अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतली. अलीकडेच एका ठिकाणी अभिनेत्री विद्या बालनला स्पॉट केलं गेलं. तेव्हा रणवीरच्या फोटोशूटविषयी विचारलं असता तिने अतिशय हटके असं उत्तर दिल आहे.

एका ठिकाणी पँपराझींनी अभिनेत्री विद्या बालन हिला स्पॉट केलं. यावेळी त्यांनी अभिनेत्रीला थेट रणवीरच्या न्यूड फोटोशूटबाबत प्रश्न केले. अख्ख बॉलिवूड त्याला समर्थन देत असलं तरी सोशल मीडिया आणि चाहते नाराज आहेत. तर त्याच्या या फोटोशूटबद्दल तुझं काय म्हणणं आहे. यावर अभिनेत्री विद्या बालन म्हणाली कि, ‘अरे काय प्रॉब्लेम आहे.. करू दे ना.. पहिल्यांदा कुणीतरी पुरुष असं करतोय.. आम्हालापण डोळे शेकू द्या ना..’. विद्याचं हे उत्तर ऐकून सगळेच हसू लागले अगदी ती स्वतः सुद्धा हसू लागली.

विद्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे आणि नेटकरी तिच्या उत्तराला प्रचंड समर्थन देत आहेत. नेहमीच बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून विद्या वावरताना दिसते. तसेच यावेळी उत्तर देतानाही तिचा हा स्वभाव स्पष्ट दिसून आलाय. एकंदरच काय कि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता असो वा अभिनेत्री जवळ जवळ सगळी इंडस्ट्री रणवीरला समर्थन देत आहे.

आतापर्यंत मुंबई, पुणे, इंदोर अशा विविध ठिकाणी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटसाठी निषेध करण्यात आल्याचे दिसून आले आहे. रणवीरने हे फोटोशूट इंटरनॅशन पेपर मॅगझिनसाठी केले होते.