Take a fresh look at your lifestyle.

‘लायगर’च्या प्रमोशनसाठी विजय- अनन्याने केला लोकल प्रवास; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे अभिनित ‘लायगर’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आता प्रमोशन एकदम जोरदार सुरु आहे. आपल्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटासाठी विजय तर अनन्या आपल्या साऊथ डेब्यूसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत. दोघंही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यासाठी मुंबईतील वांद्रे परिसरात दिसले. यावेळी ते मुलांसोबत डान्स करतानाही दिसले.

‘लायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे हे मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसले. ट्रॅफिकवर मात करण्यासाठी लोकलने प्रवास केला असेल असे अनेकांनी म्हटले. पण मुळात प्रमोशन महत्वाचं म्हणून ते दोघेही अगदी प्लॅटफॉर्मवर बसून ट्रेनची वाट पाहतानादेखील दिसले. यात अनन्या तर मूळ मुंबईची आहे मात्र लोकलने प्रवास तिच्यासाठी नवीनच होता. याशिवाय विजयसाठी तर हा अनुभव अकल्पनीय होता.

विजय आणि अनन्यासाठी ‘लायगर’ हा प्रोजेक्ट फार महत्वाचा आहे. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणार असून हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच विजय आणि अनन्या करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये दिसले होते.

दरम्यान दोघांनीही करणच्या प्रश्नांची मजेशीर उत्तरं दिली आणि प्रेक्षकांचेही मनोरंजन केले. ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्याची केमिस्ट्री लोकांना भावली पण आता मुळात चित्रपट कसा आहे हे महत्वाचं.