Take a fresh look at your lifestyle.

आवडलं म्हणून निवडलं..! कुशल बद्रिके आणि विजू मानेंच्या टी-शर्टची सोशल मीडियावर हवा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत नामांकित कॉमिक अभिनेता कुशल बद्रिके आणि दिग्दर्शक विजू माने यांची यारी म्हणजे हि दोस्ती तुटायची नाय वाल फिलिंग. खायचं, प्यायचं, फिरायचं धम्माल करायची म्हटलं कि कुशल आणि विजू हि जोडी हमखास डोळ्यासमोर येते. या दोघांची गट्टी अनेकदा कसली भारी आहे हे विजू माने यांच्या सोशक्ल मीडियावरील पोस्टमधून दिसून येत असत. यावेळी कुशलसोबत विजू यांनी चक्क भारी अशी टीशर्ट खरेदी केली आहेत. याबाबत सांगताना त्यांनी टीशर्ट मेकरचे कौतुक केले आहे.

विजू माने यांनी नेहमीप्रमाणे हि पोस्ट सोशल मीडिया फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांनी आपापल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, आवडलं म्हणून निवडलं. मध्यंतरी ठाण्यात एका प्रदर्शनाला फिरत असताना @pulaanimandali या अवलिया मित्रांची भेट झाली. त्यांनी हे टी-शर्ट दिलं. एकेक भारी स्लोगन आणि मेसेज असलेली मराठी टी-शर्ट खरच प्रदर्शनीय आहेत. कारण त्यांच्या स्टॉलवर त्या टी-शर्टवरचे मेसेज वाचता वाचताच वेळ जातो. धोक्याची सूचना: एक टी-शर्ट घ्यायचं मनात असताना आपण किमान पाच टीशर्ट विकत घेऊ शकतो.

आजकाल फॅशनचा फार वेगळा असा ट्रेंड चालू आहे. हा ट्रेंड बोले तोह एकदम झक्कास आहे. कारण तरुणाईला असच काहीतरी हटके नेहमी आवडत असत. आता विजू माने आणि कुशल बद्रिके यांनी विकत घेतलेले टीशर्टच पहा ना. हे त्याच हटके फॅशनचा एक भाग आहेत. आजकाल बाजारात आणि ऑनलाईन असे टीशर्ट हमखास उपलब्ध असतात. शिवाय हा ट्रेंड इतका कमालीचा आहे कि आपलं लक्ष वेधून घेतोच. म्हणूनच कुशल आणि विजू मानेंनाही असे टीशर्ट खरेदी करण्याचा मोह आवरला नसावा.