Take a fresh look at your lifestyle.

‘आपला पुष्पा येतोय’; ‘धर्मवीर’साठी लिहिलेली विजू मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रविण तरडे दिग्दर्शित आणि अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्ससह झी स्टुडिओज निर्मित असलेला मराठी चित्रपट ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट येत्या १३ मे २०२२ रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. जितकी अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाची चर्चा होती त्याहून कदाचित जास्तच धर्मवीर चर्चेत असल्याचे दिसत आहे. अशातच जेव्हढा पुष्पा लोकांना भावला आहे तितके धर्मवीर रिलीजआधीच भावले असताना मराठी दिग्दर्शक विजू माने यांची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करीत या चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोबतच आपला पुष्पा येतोय असं हटके कॅप्शन नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

 

विजू माने यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरसोबत त्यांनी दमदार हटके असं कॅप्शन दिल आहे. यामध्ये विजू माने यांनी लिहिले आहे कि, ”आपला ‘पुष्पा’ येतोय. मराठी सिनेमाला प्रेक्षक का येत नाहीत? ह्यावर खूप चर्चा-विनिमय सुरू असतात.

मला त्याचं एक सोपं उत्तर मिळायचं. टीजर ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणायची ताकद दिसत नाही. आणि मग साला लोक येतच नाहीत असं खापर फोडून रिकाम व्हायचं. आता मात्र एक खणखणीत ट्रेलर आलाय. मराठी चित्रपट सृष्टीत एक प्रॉब्लेम आहे जो मी जाहीर मांडतो. (मी ह्या चित्रपट सृष्टीचा भाग असूनही मान्य करतो.) इथे सगळ्यांना इतरांना चुतीयात काढायला आवडतं.

विजू माने पुढे लिहितात कि, इथे कौतुकाच इंद्रिय न दिलेले लोक खूप आहेत. एखादा सिनेमा चालला नाही की त्यात आनंद मानणारे भेटले की मला खूप दुख्ख होतं. खोटं कौतुक नकाच करू. पण आवडलेल्या गोष्टींवर दोन शब्द बोल की. बरं नाही आवडला तर स्वतःच्या मताचा आदर कर आणि गप्प बस. ते ही नाही. ठीक आहे.. व्यक्ती तितक्या प्रकृती. ‘धर्मवीर’ हा असा पहिला मराठी सिनेमा आहे ज्याच्यात इतर भाषांमध्ये ‘डब’ होऊन पराक्रम गाजवण्याची क्षमता मला तरी दिसतेय. थेटरवाल्यांकडून आगाऊ बूकिंगच्या होत असणाऱ्या चर्चा ऐकून सिनेमा बॉक्स ऑफिस वर विक्रम रचणार एवढं नक्की. आता फक्त नेमका आकडा किती ते पहायचे. (असा हा धर्मवीsssssssर कानात घोळत राहतं नाही का ?)