Take a fresh look at your lifestyle.

सौभाग्यवती भवः! शिवानीने बांधलं विराजसच्या नावाचं डोरलं; लग्नाचा साऊथ लूक व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या आपल्या कारकिर्दीत यशाची एक एक शिखरे चढत चाहत्यांच्या मनावर आपल्या नावाचा शिक्का कोरणारे हे कलाकार अगदी कुटुंबाचा एक भाग होऊन जातात न्हाई..? असेच दोन मालिका इंडस्ट्रीतील कलाकार आता एकमेकांच्या कुटुंबाचा भाग झाले आहेत. माझा होशील ना फेम विराजस कुलकर्णी आणि सांग तू आहेस ना फेम शिवानी रांगोळे यांचं शुभमंगल मोठ्या दिमाखात पार पडलं आहे. होय. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या दोघांनी साता जन्माची गाठ बांधली आहे. त्यामुळे शिवानी आता मिसेस विराजस कुलकर्णी झाली आहे. त्यांच्या लग्नाचा लूक हा साऊथ इंडियन होता मात्र विधी हिंदू पद्धतीच्याच होत्या. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये विराजस आणि शिवानी अतिशय आनंदी दिसत आहेत. इतकेच नव्हे तर एकमेकांसोबत जगण्याचे स्वप्न सत्यात साकार होत असल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यांनी आपल्या लग्नाचा पेहराव दाक्षिणात्य केला होता.

या फोटोंमध्ये आपण पाहू शकता कि, शिवानीने सोनेरी रंगाची आणि लाल काठपदर असलेली ट्रेंडी साडी परिधान केली आहे. तर विराजसने देखील शिवानीच्या लुकला साजेसा कुर्ता आणि उपरणं परिधान केलं आहे. हे फोटो सध्या सोशल मीडिया गाजवताना दिसत आहेत. त्यांचे चाहते त्यांना भरभरून प्रेम, शुभेच्छा आणि आशिर्वाद देत आहेत.

याआधी सोशल मीडियावर गेल्या २ दिवसांपासून विराजस आणि शिवानीच्या लग्नाच्या आधीचे फोटो आणि व्हिडीओ ट्रेंड होत होते. यानंतर आता लग्नाच्या फोटो व्हिडीओजची भर पडली आहे. मेहंदी आणि हळदीच्या फोटोंचीही बरीच चर्चा होती.

या सोहळ्यांनादेखील त्यांचे लूक फारच युनिक आणि लक्षवेधी होते. विराजस कुलकर्णी हा सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. तर इंडस्ट्रीमध्ये मात्र विराजसने स्वतःच्या जोरावर आपली जागा मिळवली आहे. तसेच शिवानीने देखील आपल्या अभिनयाने मालिका सृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.