Take a fresh look at your lifestyle.

सलमान खान बनवतोय कांद्याचं लोणचं ; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सलमान खानला आपण कॉमेडी करताना किंवा जबरदस्त स्टंट करताना बघितले आहे. पण जर तुम्हाला कोणी म्हणाले की बॉलीवूडचा हा भाईजान चक्क लोणचे बनवत आहे तर तुम्हाला ते खरं वाटणार नाही, पण होय हे खरं आहे. सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो कांद्याचं लोणचे बनवत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्री बीना काक यांनी शेअर केला होता, जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान कांद्याचं लोण बनवत आहे आणि बीना व्हिडिओ शूट करत आहे.

बीनाने व्हिडिओ शेयर करत एक पोस्ट लिहिली आहे की, ‘सलमानने कांद्याचे लोणचे बनवले. फन लव्हिंग, मेहनती, आउटडोअर, स्पोर्टी, पेंटर, अभिनेता गायक सलमान खानलाही स्वयंपाक करायला आवडते अशी पोस्ट केली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याचं कौतूक केलं आहे. तर काही चाहते बीना काक यांना विचारत आहे की, सलमानच्या लग्नाची जाहिराती या व्हिडिओद्वारे दिली जात आहेत का

लोणचं बनवल्यानंतर सलमानने शेवटी लोणच्याची टेस्ट घेऊन म्हटलं की, खूप चवदार आहे. दरम्यान, सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून त्याच्या चाहत्यांना देखील आवडला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.