अनुष्काच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचा विराट कोहली आहे जबरा फॅन
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारत क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे अत्यंत लोकप्रिय कपल आहे. विराट क्रिकेट जगतात अत्यंत लोकप्रिय असून एकी यशस्वी क्रिकेटपटू आहे. तर अनुष्का अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या अनुष्काने आपल्या लेकीसाठी कामातून विश्रांती घेतली आहे. मात्र आजही ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. त्यामुळे हे दोघेही सतत चर्चेत असतात. सध्या विराटची एक मुलाखत अत्यंत चर्चेत आहे. कारण या मुलाखतीत विराट पहिल्यांदा अनुष्काच्या चित्रपटाबद्दल बोलला आहे. या मुलाखतीदरम्यान त्याने अनुष्काचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट त्याचा सर्वाधिक आवडता चित्रपट आहे असे सांगितले.
अनुष्काचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट तिचा पती अर्थात विराट कोहली याचा सर्वाधिक आवडता चित्रपट आहे. इतका की, आजही फावल्या वेळात तो युट्यूबवर हा चित्रपट वारंवार बघतो. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत विराट म्हणाला, ‘अनुष्काचा ऐ दिल है मुश्किल माझा आवडता चित्रपट आहे. आजही मी हा सिनेमा बघतो. या सिनेमातील एक सीन तर मी कितीही वेळा पाहू शकतो. अनेकदा मी युट्यूबवर हा सीन बघतो. अनुष्काला कॅन्सर झालेला असतो आणि रणबीर तिला पाहायला जातो, तो सीन मला फार टच करतो. या सीनची माझ्या मनात खास जागा आहे.’
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये अनुष्काने तोडीचा अभिनय केला आहे. तिने साकारलेली व्यक्तिरेखा माझी आवडती व्यक्तिरेखा आहे. तिच्या या भूमिकेचे मी कायम कौतुक करत असतो. चित्रपटाचा तो सीन मी वारंवार पाहतो, असेही त्याने या मुलाखतीत सांगितले.
अलीकडेच विराट आणि अनुष्का आई बाबा झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी अनुष्काने एका गोड मुलीला जन्म दिला. सध्या विराट व अनुष्का दोघेही आपल्या लाडक्या लेकीच्या संगोपनात अत्यंत व्यग्र आहेत. अनुष्काने यासाठी खास इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला आहे. तर लवकरच टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड दौरा करणार आहे. तिथे विश्व टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) होणार असून ते न्यूझिलंडसोबत खेळणार आहेत.