कू वर अजून एक बाउन्सर! वीरेंद्र सेहवाग नंतर आता हा मोठा खेळाडू आला ‘कू’वर
हॅलो बाॅलिवुड आॅनलाईन : वीरेंद्र सेहवाग आणि आकाश चोपडा यांच्यानंतर आता प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू दीप दास यानेही मेड इन इंडिया ॲप ‘कू’ (Koo)वर एंट्री घेतली आहे. ‘कू’ॲपच्या स्टेडियमची कमान आता सेहवागनंतर दीप दास यांनी हाती घेतली आहे. दीप दास ‘कू’ युजर्सना आपले सखोल विचार आणि मतांद्वारे मार्गदर्शन करतील. भारतीय क्रिकेटमधले उत्कृष्ट खेळाडू असलेल्या दीप दास यांनी आता मेड इन इंडिया प्लॅटफॉर्म ‘कू’जॉईन केला आहे. दीप दास हे क्रिकेट जगतातले तज्ञ आहेत. हरेक खेळाडूबाबत ते मार्मिक टिप्पणी करतात. संधी मिळाली की आपल्या चाहत्यांना ते विचार, मतं आणि अनुभव सांगत असतात. ड्रेसिंग रुममध्ये कोण खेळाडू काय म्हणाला हे किस्सेही ते अतिशय खुमासदारपणे सांगतात.
दीप दास यांच्या किश्श्यांमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुलीपासून ते लोकप्रिय खेळाडू महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली हे सगळे असतात. सोबतच विदेशांतील कुशल खेळाडुंचे किस्सेही ते रंजकपणे सांगतात. दीप दास यांचे विचार आणि किस्से वाचण्यासाठी त्यांना Koo ॲपवर जाऊन @Deepdasgupta या हॅन्डलवर फॉलो करू शकता.
दीप यांनी ‘कू’ला सर्वात मोठं स्टेडियम संबोधत फॅन्सना तिथे आमंत्रित केलं आहे. दीप दास यांनी या प्लॅटफॉर्मसह युजर्सोसबत जोडून घेण्यासाठी एक व्हीडिओही शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात, ‘मॅचमध्ये कोण कुणाला फिरकी टाकेल, कोण हेलिकॉप्टर शॉटची कमाल दाखवेल, ड्रेसिंग रुममधली मजा-मस्ती ते बिहाइंड द सीन्सचं नाट्य… असं सगळं तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि सोबतच आहे आकर्षक बक्षिस जिंकण्याची संधीही!’