Take a fresh look at your lifestyle.

‘तेरा होगया रे.. तू जीत गया रे..’; विशाखा सुभेदारची लाडका मित्र सम्यासाठी खास बर्थडे पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. या शोने अगदी कोव्हिडच्या भीषण काळातही लोकांना पोट धरून हसवलं. एकापेक्षा एक उत्तम कलाकार, सुंदर कॉमिक टायमिंग आणि बहारदार स्किट्सने हा शो परिपूर्ण आहे. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे विशाखा आणि सम्याची जोडी. अर्थात ‘समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार’ यांची खळखळून हसवणारी जोडी. हे दोघे एकदा का मंचावर आले कि मग हास्याच्या तडाख्याला सुट्टीच नाही. पण अलीकडेच विशाखाने हा शो सोडला आणि हि जोडी तुटली पण दोस्ती अजूनही आहे. म्हणूनच आज समीरच्या वाढदिवसानिमित्त विशाखाने एक खास पोस्ट केली आहे.

या पोस्ट मध्ये विशाखाने आपल्या मित्राचे तोंड भर कौतुक केले आहे. तिने लिहिलंय कि, ‘सम्या… वेड्या माणसा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… ह्या गेल्या काही वर्षांत आपण एकत्र काम असताना, तुझ्याकडून खूप ऊर्जा मिळाली, प्रेसेन्स ऑफ माइंड, इन्स्टंट ह्या सारख्या अनेक गोष्टी शिकले.. खूप काही share केलंय आपण… एक मंच अनेक वर्ष share केला..! तू उत्तम हाडाचा कलाकार आहेस मित्रा. तुझ्यातला लेखक दिवसेंदिवस स्फूरत चालल्ला आहे.. आत्ता तुला मागे वळून बघायची गरज नाही.. खूप आनंदात, सुखात रहा. कारण उभ्या महाराष्ट्राला तुला आनंदात ठेवायचं आहे.. सगळ्यांनाच्या गळ्यातला ताईत झाला आहेस तू..!

पुढे लिहिलंय कि, आपल्या जोडीने खूप छान छान प्रसंग अनुभवले आहेत. आपण भांडलो, रुसलो, हट्टी वागलो, हिरमूसलो, हसलो,मस्ती केली, खोड्या फाजील काढल्या, किस्से.आणि प्रेमही तितकेच. टॉम अँड जेरी सारखं… सम्या जे जे तुला हवं ते ते तू मिळवतोच.. त्यामुळे ते तुला मिळेलच. तेरा होगया रे…. तू जीत गया रे… मनापासून शुभेच्छा.. सम्या.. love u दोस्ता.. युती तुटली तरी दोस्ती नाय..’ अशा शब्दात तिने समीरला त्याच्या वाढदिवसाच्या खास दिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.