Take a fresh look at your lifestyle.

सांगलीच्या विशालने मिळवले बिग बॉस मराठी 3’चे विजेतेपद; जाणून घ्या कोण ठरलं सेकंड रनरअप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| दिनांक २६ डिसेंबर २०२१ ची संध्याकाळ फारच अनोखी आणि रोमांचक ठरली. कारण मराठी वाहिनी कलर्स वरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस मराठी ३चा ग्रँड फिनाले सोहळा एकदमी उत्साहात पार पडला. अखेर कोण होईल विजेता? याबाबतची सर्वांची उत्सुकता संपली आणि सांगलीचा रांगडा गडी विशाल निकमने बिग बॉस मराठी ३’ची ट्रॉफी पटकावली. यानंतर सोशल मीडियावर एकच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बिग बॉस मराठीच्या चाहत्यांनी विशाल निकमचे भरभरून कौतुक केले आहे. तर अनेकांनी रनरअप कोण ठरलं याविषयी बरीच चर्चा केल्याचे दिसून आले.

एकंदरच १०० दिवसांचा हा पल्ला पार करून अखेर बिग बॉसच्या घरातले लाईट बंद करून बाहेर पडलेले हे स्पर्धक मोठ्या हिंमतीने आणि चुरशीने लढले. जय दुधाणे, विकास पाटील, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे आणि मीनल शाह हे ज्या दिवशी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचे टॉप ५ म्हणून घोषित झाले त्याच दिवशी खर तर हे सारे विजेते झाले होते. पण स्पर्धा म्हंटलं की ट्रॉफीचा मानकरी आलाच आणि अखेर सर्वांना मागे टाकून विशाल निकम ठरला बिग बॉस मराठी ३चा महाविजेता.

बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनाले मध्ये सर्व स्पर्धकांनी टॉप क्लास परफॉर्मन्स करीत मनोरंजनाचा तडका लगावला. यानंतर सर्वांची धाकधूक वाढली आणि टॉप ५ मधून एक एक स्पर्धक बाहेर पडू लागले. यात पाचव्या क्रमांकावर स्पर्धेतून बाद झाली ती मीनल शाह. यानंतर घरातून बाहेर पडणारा दुसरा स्पर्धक होता उत्कर्ष शिंदे आणि यानंतर विकास पाटील. अर्थात उरले होते फक्त दोन स्पर्धक विशाल आणि जय. हे दोघे घराच्या लाईट बंद करून बाहेर आले. एव्हाना सर्वांची उत्सुकता इतकी ताणली गेली होती की काही विचारू नका.. आणि यानंतर महेश मांजरेकर यांनी विजेता म्हणून विशाल निकमचे नाव जाहीर केले आणि जय दुधाणेच्या नावे उपविजेता पद आले.

बिग बॉस मराठी ३ चा विजेता विशाल निकम हा मूळ सांगलीचा लेक आहे. त्याच्या मुखात माऊली, काळजात माऊली असा विशाल प्रत्येकाच्या मनात घर करून गेला. ज्याने खेळासाठी बुद्धीपेक्षा हृदयाचं जास्त ऐकल आणि जिंकून घेतल सार… याआधी विशालने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. आता बिग बॉस मराठीचे विजेतेपद मिळवल्यानंतर त्याच्यासाठी यशाच्या नव्या दिशा खुल्या होतील हीच आशा.