Take a fresh look at your lifestyle.

चप्पा चप्पा चरखा चले; साबरमती आश्रमाला भेट देत भाईजानने चालवला बापूजींचा चरखा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठवड्यात २६ नोव्हेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याचा अंतिम – द फायनल ट्रुथ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपट सलमान खान, आयुष्य शर्मा आणि महिमा मकवाना अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून एक आठवडासुद्धा झालेला नाही तर हा चित्रपट चांगलीच कामे करताना दिसत आहे. असे असताना अभिनेता सलमान खान मात्र चित्रपटाचे प्रमोशन अजूनही करताना दिसत आहे. दरम्यान आता भाईजानने पहिल्यांदाच भाईगिरी सोडून गांधीगिरीत रस घेतल्याचे दिसले. आज सोमवारी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट देताना सलमानने बापूजींचा चरखा देखील चालवला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये डेनिम्स आणि हिरवा टीशर्ट परिधान केलेला सलमान नेहमीप्रमाणेच एकदम फिट अँड फाईन दिसतोय. महात्मा गांधींच्या अनेक निवास स्थानांपैकी एकाला भेट देताना सलमानने आपल्या चाहत्यांना एक झलक देत त्यांना आनंद दिला आहे. सलमानच्या अचानक येण्यामुळे साबरमती आश्रमाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला.

कारण अनेक चाहत्यांनी भाईजानची एक झलक पाहण्यासाठी आश्रमात गर्दी केली होती. भाईजानसोबत एक सेल्फी घेण्यासाठी गर्दी जमल्याने सलमानला कडक सुरक्षा व्यवस्थेने वेढले होते. आश्रमाच्या आत गेल्यानंतर मात्र सलमान मोकळा झाला आणि त्याने संपूर्ण आश्रम निरखून घेतलॆ.

यानंतर बापूजींचा चरखा सलमानने आजमावला आणि हे पाहणे सर्वांसाठीच कुतूहलाचे तितकेच मनोरंजक ठरले. चरखा हाताळण्यापूर्वी भाईजान जमिनीवर खाली बसला आणि त्याने अलगद हळुवारपणे चरख्यावर आपली बोटे फिरवीत त्याला हाताळण्याचा प्रयत्न केला. यानंतर सलमानने गेस्ट बुकमध्ये एक संदेशही लिहिला आहे. यात त्याने लिहिले कि, चरका वापरण्याची माझी हि पहिली वेळ असून ती अगदीच आश्चर्यकारक आणि अभूतपूर्व होती. मी हा अनुभव कधीही विसरणार नाही. राष्ट्रपिता गांधीजींचा सन्मान करीत मी पुन्हा येथे भेट देईन अशी आशा व्यक्त करतो. येथे मिळालेल्या प्रेमासाठी मी सर्वांचे आभार मानतो. दरम्यान सलमानची सुरक्षा अतिशय कडक असल्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला दुरूनच पहिले तर काही महिला चाहत्यांनी त्याला दुरूनच ओवाळले.