Take a fresh look at your lifestyle.

तिथेही नाही आणि इथेही नाही; सुझेनवर पडणार शुभ्रा भारी, पहा वायरल व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगंबाई सासूबाई या मालिकेच्या यशानंतर झी मराठीवर या मालिकेचा दुसरा भाग अर्थात दुसरे पर्व सुरु झाले आहे. अगंबाई सुनबाई यानाच्या पर्वातील अनेक पात्रे तीच असून मुख्य दोन पत्रे मात्र बदलण्यात आली होती. शुभ्रा आणि सोहम. आधीच्या पर्वात हि पात्रे अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता आशुतोष पत्की यांनी साकारली होती. त्यानंतर आताच्या पर्वत अभिनेत्री उमा ऋषिकेश आणि अभिनेता अद्वैत दादरकर या भूमिकांना न्याय देत आहेत. हे पर्व देखील आधीच्या पर्वाइतकेच चांगले गाजताना दिसत आहे. शिवाय यातील पात्रे ऑनस्क्रीनसोबत अगदी ऑफस्क्रीनसुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. नुकताच एक व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे आणि हा व्हिडीओ आहे सुझेन आणि शुभ्राचा.

 

https://www.instagram.com/reel/CQQT3R8DJdY/?utm_source=ig_web_copy_link

 

अगदी काहीच काळात प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या मालिकेतील शुभ्रा अर्थात उमानेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यामुळे ह्या मालिकेत तिच्याबाबत दाखवला जाणारा प्रत्येक क्षण प्रेक्षकांवरही प्रभाव करतो. मालिकेत सोहम आणि शुभ्राच्या आयुष्यात घुसून त्यांचे नाते तोडण्याचा प्रयत्न करणारी सुझेन अर्थात अभिनेत्री गीतांजली गनागे मात्र प्रेक्षकांच्या नाराजीची मानकरी झाली आहे. यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेको नेटकरी फार आनंदी आहेत. सध्या मालिकेतील ट्विस्ट्सप्रमाणे शुभ्राने आता सुझेनला धारेवर घेणे मनावर घेतले आहे. या व्हिडिओतही तसेच काहीसे दिसत आहे.

मुख्य म्हणजे हा व्हिडीओ मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागाच्या शूटिंग वेळी फावल्या वेळेत केला आहे. या व्हिडिओमध्ये एका मीम व्हिडिओच्या डायलॉग्सचा वापर केला आहे. सुझेन म्हणे, मी इतकी सुंदर आहे तर मी काय करू? यावर शुभ्रा म्हणते, हि जी बडबड आहे ती सगळेच करतात. तू जाऊन काम कर. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. इतकेच नव्हे तर, या व्हिडिओवर अनेक लोक विविध कमेंट करीत आहेत. या कमेंट्समधून सुझेन या पात्रांविषयी मनात असलेला राग लोक व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र भूमिकेवरील राग किंवा प्रेम ही कलाकारासाठी खरी पावती असते.